Smita Sabharwal Success Story She is the youngest IAS officer in the country
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच By ओमकार संकपाळ | Published: May 22, 2024 6:31 PM1 / 11सेलिब्रेटींप्रमाणे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्यांची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळते. मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहचून अधिकारी बनलेले तरूण-तरूणी अनेकांसाठी आदर्श असतात. 2 / 11तेलंगणातील आयएएस अधिकारी स्मिता सभरवाल हे यातीलच एक नाव. त्या सौंदर्याच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना देखील मात देतात. त्यांचा अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.3 / 11स्मिता यांचा जन्म १९ जून १९७७ रोजी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे एका बंगाली कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांनी कर्नल म्हणून सेवा दिली. लहानपणापासूनच देशसेवेचे धडे कानावर पडल्यानंतर स्मिता यांनी आपला मोर्चा यूपीएससीकडे वळवला. 4 / 11स्मिता यांनी १२ वी मध्ये असताना ICSE परीक्षेत भारतात पहिला क्रमांक पटकावला होता. 5 / 11पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्या वयाच्या २२ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी सज्ज झाल्या अन् उत्तीर्ण देखील झाल्या. 6 / 11त्या चौथ्या रँकसह उत्तीर्ण झाल्या. देशातील सर्वात तरूण आयएएस अधिकारी म्हणून त्यांना ओळख मिळाली. २२ व्या वर्षी अधिकारी झालेल्या स्मिता ह्या दिवसातील सहा तास अभ्यास करत असत. 7 / 11स्मिता यांनी आयपीएस अधिकारी अकुन सभरवाल (IPS Akun Sabharwal) यांच्याशी विवाहगाठ बांधली. 8 / 11खरे तर दोघांचेही वडील भारतीय सेनेत होते. त्यांना दोन अपत्ये असून, मुलाचे नाव नानक तर मुलीचे नाव भुविस असे आहे.9 / 11स्मिता ह्या मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आयएएस अधिकारी आहेत. त्या सध्या तेलंगाणा सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. 10 / 11सर्व फोटो सौजन्य - Smita Sabharwal Instagram11 / 11सर्व फोटो सौजन्य - Smita Sabharwal Instagram आणखी वाचा Subscribe to Notifications