Success Story of Chandrasekhar Ghosh who sell milk after became the owner of Bandhan bank
एकेकाळी दूध विकायचा, पण ‘त्या’ क्षणानं अख्खं आयुष्यचं बदललं अन् बँकेचा मालक बनला By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 1:20 PM1 / 12प्रयत्न करणाऱ्यांचा कधी पराभव होत नाही. आज याचाच प्रत्यय चंद्रशेखर घोष यांच्याकडे पाहिल्यानंतर सर्वांना येतो. एक दूध विकणारा व्यक्ती बँकेचा मालक बनला आणि यशाचं शिखर गाठलं. बंधन बँकेचे(Bandhan Bank) मालक चंद्रशेखर घोष(Chandrasekhar Ghosh) हे तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य बनून जीवन जगत होते2 / 12चंद्रशेखर यांच्याकडे शिक्षणासाठी पैसे नव्हते. तेव्हा लहान मुलांची शिकवणी घेऊन त्यांनी स्वत:चं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महिलांबद्दल मदतीची भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि त्यांनी बंधन बँकेचा पाया रचला. एका सामान्य विचाराचं मूल्य आजच्या घडीला ३० हजार कोटींपर्यंत येऊन पोहचलं.3 / 12बंधन बँकेबद्दल तुम्हाला माहिती असेल. आज या बँकेचे सीईओ चंद्रशेखर घोष यांच्याबद्दल जाणून घेऊया. सामान्य मिठाई विकणाऱ्याच्या घरात चंद्रशेखर घोष यांचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने लहानपणापासून दूध विकण्याचं काम करत होते.4 / 12आश्रमातील जेवणाने पोट भरलं, लहान मुलांची शिकवणी घेऊन स्वत:चं शिक्षण पूर्ण केले. वडील मिठाईचं लहान दुकान चालवतं. त्यांच्या मुलाने खूप मोठं व्हावं असं त्यांचे स्वप्न होते. परंतु मिठाईच्या दुकानावर घर सांभाळणं आणि मुलांना शिक्षण देणं कठीण होतं. 5 / 12मात्र म्हणतात ना, जिद्द उराशी बाळगली असेल तर कुठलाही संघर्ष तुम्हाला ध्येयापासून मागे हटवू शकत नाही. चंद्रशेखर घोष यांनी मेहनतीच्या जोरावर मुलांची शिकवणी घेऊन शिकले. त्यानंतर ढाका विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. 6 / 12चंद्रशेखर घोष यांनी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी दर महिना ५ हजार रुपये पगारावर नोकरी केली. परंतु स्वत:चं नशीब आजमवायचं त्यांनी ठरवलं. १९९० च्या अखेरीस बांग्लादेशात महिला सशक्तीकरणासाठी काम करणाऱ्या विलेज वेलफेयर सोसायटी नावाच्या NGO मध्ये त्यांनी प्रोग्राम हेड म्हणून काम केले. 7 / 12हे काम करताना त्यांनी पाहिलं की, गावातील महिला छोट्या आर्थिक मदतीनं काम सुरू करून स्वत:चं जीवनमान उंचावू शकतात. तेव्हा त्यांच्या मनात पहिल्यांदा हा विचार आला. अशा महिलांना आर्थिक सहाय्य दिलं जाऊ शकतं त्यामुळे अनेक छोटे छोटे उद्योग उभारले जाऊ शकतात. महिलांच्या साथीने देशाची प्रगतीही होऊ शकते. हाच तो क्षण होता ज्याने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदललं.8 / 12चंद्रशेखर घोष यांनी पाहिलं की, एक भाजीवाला सावकाराकडून रोज ५०० रुपये उधार घ्यायचा. त्या पैशाने तो भाजी विकत घ्यायचा आणि दिवसभर भाजी विकून पैसे कमवायचा. त्यानंतर मूळ रक्कमेसह व्याजाने सावकाराला पैसे करत करायचा. घोष यांनी संपूर्ण गणित समजून घेतलं. तेव्हा बंधन बँकेची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली.9 / 12२००१ मध्ये चंद्रशेखर घोष यांनी काही पैशांची व्यवस्था करून बंधन बँक उघडली. त्यानंतर छोट्या स्तरावर स्वत:चा उद्योग करणाऱ्या महिलांना कर्ज देण्यास सुरुवात केली. हळूहळू काम वाढू लागलं. त्यानंतर २३ ऑगस्ट २०१५ रोजी बंधन बँक व्यावसायिक सुविधा देण्यास सुरू झाली.10 / 12इतक्यावरच न थांबता माइक्रो संस्था बंधन बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्यावसायिक बँक म्हणून काम करण्याची परवानगी मिळाली. आज पश्चिम बंगालमधील महिलांना स्वत:च्या जीवावर बँक २-२ लाखाचे कर्ज उपलब्ध करून देते. 11 / 12भारतातील २१ प्रतिष्ठीत बँकेच्या यादीत बंधन बँकेचा नंबर लागतो. चंद्रशेखर घोष या बँकेचे मालक आणि संचालक आहेत. सध्याच्या काळात बंधन बँकेच्या देशभरात २ हजाराहून अधिक शाखा आहे. याचं मूल्य ३० हजार कोटीहून अधिक आहे. 12 / 12या बँकेत केवळ महिलांना मेंबरशिप आहे आणि रिकवरी रेट १०० टक्के आहे. २०११ मध्ये जागतिक बँकेच्या एका सहाय्यक इकाई इंटरनॅशनल फायनॅन्स कॉरर्पोरेशनने बंधन बँकेत १३५ कोटींची गुंतवणूक केली. अनेक महिलांना बंधन बँक मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications