शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वयाच्या २६ वर्षी UPSC परीक्षेत यश मिळवलं; कोण आहे फराह हुसैन? एकाच घरात ३ IAS, १ IPS

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:11 IST

1 / 8
UPSC ची परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून या परीक्षेची तयारी करतात परंतु काहीच जणांना त्यात यश मिळते.
2 / 8
फराह हुसैन ही त्याच यशस्वी विद्यार्थ्यांपैकी एक, जिने वयाच्या २६ व्या वर्षीय UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यात IAS अधिकारी म्हणून तिची नियुक्ती झाली. विशेष म्हणजे तिच्या कुटुंबातील बरेच जण वरिष्ठ शासकीय सेवेत आहेत.
3 / 8
फराह हुसैनचा जन्म राजस्थानच्या झुंजूनू जिल्ह्यातील नवान गावात एका मुस्लीम कुटुंबात झाला. लहानपणापासूनच तिला शिक्षणाचे धडे मिळाले. या कुटुंबातील बहुतांश उच्च शिक्षण मिळवून आयएएस, आयपीएस बनले आहेत.
4 / 8
झुंजूनू येथील शाळेचं शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी फराह मुंबईला आली. जिथे शासकीय लॉ कॉलेजमध्ये तिने कायद्याची पदवी घेतली. फराहला सुरुवातीला डॉक्टर बनायचे होते. परंतु काळाप्रमाणे तिचे लक्ष्यही बदलले.
5 / 8
फराहला गुन्हेगारी क्षेत्रात वकील बनायचे होते. त्याशिवाय तिने UPSC परीक्षेचीही तयारी सुरू केली. वयाच्या २६ व्या वर्षी २०१६ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात तिने यूपीएससी परीक्षा पास केली. ऑल इंडिया रँकिंगमध्ये तिने २६७ क्रमांक पटकावला.
6 / 8
फराह अशा कुटुंबातून येते जिथे तिच्या घरातील सर्व शासकीय सेवेत रुजू आहेत. तिचे वडील अशफाक हुसैन जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तिचे काका लियाकत खान एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी होते जे आयजी म्हणून निवृत्त झाले. आणखी एक काका झाकीर खान एक आयएएस अधिकारी आहेत.
7 / 8
फराहनं एलएलबी शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर ती तिच्या बॅचमधील एकमेव विद्यार्थिनी होती, जिला देशातील प्रसिद्ध वकील महेश जेठमलानी यांच्या टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली. काही काळ तिने क्रिमिनल लॉयर म्हणूनही काम केले.
8 / 8
फराहची मोठी बहीण राजस्थानच्या उच्च न्यायालयात वकील आहे. तिचा चुलत भाऊ, सासरचेही महत्त्वाच्या पदावर आहेत. जर मन लावून आपण एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केला तर वाटेत कितीही अडचणी असल्या तरीही यश मिळतेच हे फराहकडे बघितल्यावर शिकायला मिळते
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग