शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलानं IAS अधिकारी व्हावं ही आईवडिलांची इच्छा, पण बनला ‘चहावाला’; कमाई ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 8:42 AM

1 / 12
असं म्हणतात की जे नशिबात लिहिलंय तेच होतं. असाच काही प्रकार मध्य प्रदेशातील २ युवकांसोबत घडला आहे. या युवकांच्या आईवडिलांना त्यांच्या मुलांनी शिक्षण घेऊन IAS अधिकारी व्हावं अथवा चांगली नोकरी करावी असं वाटत होतं. परंतु हे दोघंही चहावाला बनले.
2 / 12
भारतात सामान्यत: प्रत्येक घरात चहा प्यायली जाते. लोकांनाही त्याची सवय आहे. अनुभव आणि आनंदने चहाच्या या सवयीला एका बिझनेस मॉडेलमध्ये रुपांतरीत केले. अनुभव आणि आनंद यांनी चहा विकण्यास सुरुवात केली आणि कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत.
3 / 12
अनुभवच्या आईवडिलांनी मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी इंदूरला पाठवलं. याठिकाणी त्याची मैत्री आनंद नायकसोबत झाली. दोघंही एकत्र शिक्षण घेत होते. त्यानंतर आनंदनं मध्येच शिक्षण सोडून एका नातेवाईकासोबत उद्योगधंद्यात उतरला. अनुभवला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर UPSC तयारीसाठी दिल्लीत पाठवलं. मुलानं IAS अधिकारी व्हावं असं त्यांचे स्वप्न होते.
4 / 12
काही काळानंतर अचानक आनंदचा अनुभवला फोन आला. दोघांची भेट झाली. यावेळी आनंद बिझनेस चालत नसल्यानं उदास होता. आपण दोघं मिळून काही नवीन करू असं दोघांमध्ये बोलणं झालं. अनुभवच्या मनात कधीही बिझनेसचा विचार नव्हता. तरीही त्याने लगेच होकार देत प्लॅनिंग सुरू केले.
5 / 12
बिझनेस प्लॅनिंगचा विचार करता करता त्यांना आयडिया आली की, देशात पाण्यानंतर सर्वात जास्त चहा प्यायली जाते. प्रत्येक ठिकाणी चहाची मागणी असते. यापासून सुरुवात केल्यास जास्त गुंतवणुकीची गरज भासणार नाही. मग दोघांनी मिळून चहाचं दुकानं उघडलं. चहाची टेस्ट आणि मॉडेल युनिक असेल जे युवकांना आकर्षिक करेल असं त्यांनी ठरवलं.
6 / 12
२०१६ मध्ये ३ लाख गुंतवणुकीतून दोघांनी इंदूरमध्ये चहाचं पहिलं दुकान उघडलं. आनंदनं पहिल्या उद्योगातून बचत केलेले पैसे गुंतवणूक केले. एका गर्ल्स हॉस्टेलजवळ त्यांनी भाड्याने रुम घेतली. काही जुन्या फर्निचरसोबत काही मित्रांकडून पैसे उधार घेतले. आउटलेट डिझाईन तयार केले. यात त्यांचे पैसे संपले. बॅनर बनवायलाही पैसे नव्हते. त्यानंतर त्यांनी नॉर्मल लाकडाच्या बोर्डावर हाताने चहाच्या दुकानाचं नाव लिहिलं ‘चाय सुट्टा बार’
7 / 12
अनेक अडचणींचा सामना करत अनुभव आणि आनंदने चहाचं दुकानं उघडलं. सुरुवातीला लोकांनी अनुभवच्या आई वडिलांना नावं ठेवली. तुम्हाला तुमच्या मुलाला आयएएस अधिकारी बनवायचं होतं. UPSC तयारीसाठी दिल्लीला पाठवलं असे टोमणे मारले. अनुभवच्या आईवडिलांना त्याचा निर्णय आवडला नाही. मात्र हळूहळू ग्राहक वाढले आणि चांगली कमाई होऊ लागली.
8 / 12
‘चाय सुट्टा बार’ हळूहळू परिसरात फेमस होऊ लागला. माध्यमांमध्येही बातम्या झळकल्या. दोघांच्या नातेवाईकांकडूनही पाठिंबा मिळाला. आज हे दोघंही वर्षाला १०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करतात. देशभरात १६५ आऊटलेंट्स असून १५ राज्यात हा व्यवसाय पसरला आहे. विशेष म्हणजे या दोघांनी एक रजिस्टर बनवलं आहे ज्यात यांनी अशा लोकांची नावं लिहिली आहेत जे हा व्यवसाय करण्यासाठी दोघांना नकार देत होते
9 / 12
आनंद आणि अनुभव सांगतात की, जेव्हा कधीही आम्ही नव्या आउटलेटचं उद्धाटन करतो तेव्हा लोकांना मोफत चहा, कॉफी पाजतो. ही बिझनेस स्ट्रैटर्जी आहे. या बहाण्याने आमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहचतो. चहा आवडल्यानंतर ते आमचे ग्राहक बनतात. परदेशातही आमचे ५ आऊटलेट्स आहेत.
10 / 12
या बिझनेसने आनंद आणि अनुभवं २५० कुंभारांना रोजगार दिला. कुंभार त्यांच्यासाठी कुल्हाड बनवण्याचं काम करतात. देशभरात आऊटलेट्समध्ये प्रत्येक दिवशी १८ लाख ग्राहक येतात. याठिकाणी ९ वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचा आस्वाद घेतात. ज्यात आलं, इलायची, पान, केसर, तुलसी, लिंबू आणि मसाला चहाचा समावेश आहे.
11 / 12
‘चाय सुट्टा बार’मध्ये १० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत चहा विक्री होते. लवकरच ते देशभरात आणखी आऊटलेट्स वाढवण्याच्या तयारीत आहेत. देशातील प्रत्येक छोट्या शहरांमध्ये चहाचा असा मॉडेल असेल ज्यामुळे गरिबांना व्यवसाय मिळेल असं ते सांगतात.
12 / 12
हे दोघं फ्रेंचायसी मॉडेलवर काम करतात. चहाचा फॉर्म्युला फ्रेंचायसी चालवणाऱ्याकडे पाठवला जातो. त्यानंतर काही कमीशन चार्ज केला जातो. बाकी बिझनेस आऊटलेटमध्ये त्याची भागीदारी असते. या फ्रेंचायसी मागणी वाढत आहे. फ्रेंचायसी घेणारा २ ते ६ लाख रुपये कमाई करतो.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी