CoronaVirus Live Updates : कोरोना लसीकरणाचा वेग वाढला नाही तर जीवघेणा होऊ शकतो Delta Variant; WHO चा धोक्याचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 11:16 AM1 / 14जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 19 कोटींचा टप्पा पार केला आहेत. तर कोरोनाने 40 लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. 2 / 14वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. 3 / 14जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक ठरणार असून जीवघेणा होईल असं म्हटलं आहे. 4 / 14डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल. डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल असं देखील WHO ने म्हटलं आहे.5 / 14लसीकरण मोहिमेवर अधिक जोर देणं गरजेचं आहे नाहीतर हा धोका खूप वाढेल. त्यामुळेच सप्टेंबरच्या शेवटपर्यंत सर्व देशांनी आपल्या देशातील कमीतकमी 10 टक्के लोकसंख्येचं लसीकरण करणं गरजेचं आहे असं आवाहन WHO ने केलं आहे. 6 / 14जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी याबाबत भाष्य केलं आहे. आतापर्यंत, चार चिंताजनक कोरोना व्हायरसचे प्रकार समोर आले आहेत आणि व्हायरस पसरत राहिल्याने आणखी येत राहतील. डब्ल्यूएचओच्या सहापैकी पाच क्षेत्रांमध्ये, गेल्या चार आठवड्यांत सरासरी संसर्ग 80 टक्क्यांनी वाढला आहे असं टेड्रॉस यांनी म्हटलं आहे. 7 / 14मायकल रायन यांनी जरी डेल्टाने अनेक देशांना हादरवून टाकले असले तरी, त्याचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी उपाय अजूनही आहेत. विशेषतः सोशल डिस्टसिंग पाळणे, मास्क घालणे, हाताची स्वच्छता याद्वारे डेल्टाचा प्रसार टाळता येऊ शकतो असं म्हटलं आहे. 8 / 14कोरोना व्हायरस वेगाने वाढतच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी हे उपाय अजूनही काम करत आहे, पण आपल्याला आधीपेक्षा अधिक कार्यक्षम आणि अधिक प्रभावीपणे हे उपाय अंमलात आणण्याची गरज आहे' असं देखील रायन यांनी म्हटलं आहे. 9 / 14जागतिक आरोग्य संघटनेने 2022 च्या मध्यापर्यंत जगातील 70 टक्के लोकसंख्येचं पूर्ण लसीकरण होणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. अनेक देशात लसीकरण वेगाने सुरू असून कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 14कोरोना मृतांच्या संख्येत तब्बल 21 टक्क्यांनी वाढ झाली असून येत्या दोन आठवड्यात रुग्णांची संख्या ही 20 कोटींहून अधिक असणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. कोरोनाचा सर्वत्र कहर पाहायला मिळत आहे.11 / 14कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा दर असाच कायम राहिल्यास येत्या दोन आठवड्यांमध्ये जगभरातील रुग्णांची संख्या 20 कोटीहून अधिक होईल. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट यामागचं मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे.12 / 14जगभरातील कोरोना बळींचा आकडा वाढून तो आता 40 लाखांहून अधिक झाला आहे. रुग्णांची सर्वाधिक नोंद अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया, ब्रिटन आणि भारतात नोंदवण्यात आली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.13 / 14रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, अधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा आणखी आठ देशांमध्ये पसरला आहे. त्यामुळे आता तो आता एकूण 132 देशांमध्ये आढळून येत आहे.14 / 14अनेक देशांमध्ये लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रय़त्न केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्लारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications