शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Balvant Parekh: स्वातंत्र्यसेनानी, शिपाई ते भारताचा फेव्हिकॉल मॅन; जाणून घ्या बळवंत पारेखांची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 11:08 AM

1 / 11
टाटा, अंबानी, बिर्ला, अदानींबाबत आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. परंतू तुम्हाला फेव्हिकॉलच्या जन्मदात्याविषयी माहितीये का? बळवंत पारेख (Balvant Parekh) यांना भारताचा फेव्हिकॉल मॅन (Fevicol Man) म्हणून ओळखले जाते. फेव्हिकॉलबरोबरच फेव्हीक्विक, एम-सील हे देखील त्यांच्याच कंपनीचे. चला जाणून घेऊया घराघरात नाव असलेल्या पण या अज्ञात स्वातंत्र्यसेनानीं बाबत. (Story Of India's Fevicol Man, Balvant Parekh)
2 / 11
बळवंत पारेख हे 2013 मध्ये फोर्ब्सच्या यादीत 45 वे श्रीमंत भारतीय होते. पारेख यांची पार्श्वभूमी सामान्य कुटुंबातील आहे. त्यांनी 1959 मध्ये फेव्हिकॉलची कंपनी Pidilite Industries स्थापन केली. परंतू त्या आधीचा त्यांचा इतिहास रंजक आहे.
3 / 11
पारेख यांचा जन्म भावनगर जिल्ह्यातील महुआ येथे झाला. गुजराती ट्रेंडनुसार त्यांना व्यावसायिक व्हायचे होते. परंतू त्यांना घरच्यांनी वकीली शिकण्यासाठी दबाव टाकला. अखेर त्यांना मुंबईतील सरकारी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला.
4 / 11
मात्र, याचवेळी इंग्रजांविरोधात चले जाव आंदोलन जोर पकडू लागले होते. भारतभरात महात्मा गांधींच्या विचारांची लाट आली होती. तरुणाई या आंदोलनात उतरली होती. बळवंत पारेख मागे राहतील ते कसले. त्यांनी वकीलीचे शिक्षण अर्धवट सोडून स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले.
5 / 11
गुजरातमध्ये परत गेले आणि विविध समाजसेवेची कामे, स्वातंत्र्य लढ्याच्या मोहिमांमध्ये भाग घेतला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते पुन्हा शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबईत परतले.
6 / 11
Balvant Parekh यांचे आजोबादेखील निष्णात वकील होते. बळवंत यांच्या वडीलांना ते आजोबांसारखे व्हावेत असे वाटत होते. परंतू बळवंत यांचे मन स्वप्नांची नगरी मुंबईतच लागले होते. वकीली करण्याचा घरच्यांचा दबाव झुगारला.
7 / 11
हातात काही कामधंदा नसताना त्यांनी कांताबेन यांच्याशी लग्न केले. मग त्यांना आर्थिक तंगी भासू लागली. त्यांनी सुरुवातीला डाईंग आणि प्रिटिंग प्रेसमध्ये काम सुरु केले. नंतर त्यांनी एका लाकुड व्यापाऱ्याच्या कार्यालयात शिपायाची नोकरी पत्करली.
8 / 11
बळवंत हे पत्नीसह एका मित्राच्या वेअरहाऊसमध्ये राहत होते. शिपायाच्या नोकरीतून काही भागत नव्हते. संधी शोधत होते. त्यांनी ओळखी वाढवायला सुरुवात केली, इंपोर्ट एक्स्पोर्ट होणाऱ्या वस्तूंची यादी तयार केली. या छोट्याश्या उलाढालीत त्यांना जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी व्यवसायाच्या टीप्स आणि ट्रीक्स शिकल्या, ज्या त्यांना पुढील आयुष्यात कामी आल्या.
9 / 11
Hoechst शी संबंधीत एका फर्मसोबत काम करत असताना त्यांना मोठी संधी मिळाली. 1954 मध्ये त्यांनी स्वत:चे मुंबईतील जेकब सर्कलमध्ये Parekh Dyechem Industries दुकान सुरु केले. इथेच त्यांनी टेक्सटाईल प्रिंटिंगसाठी लागणारे रंगांशी संबंधीत रसायन बनविण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांचा भाऊ सुशिल पारेख यांची मदत मिळाली.
10 / 11
यानंतर त्यांनी 1959 मध्ये Pidilite ची स्थापना केली. त्यावेळी गोंद ही अनब्रँडेड होती. यानंतर भारतीय कारपेंटरमध्ये Fevicol लोकप्रिय झाले. एवढे लोकप्रिय झाले की, घराघरात आज कोणतीही वस्तू, चप्पलजरी चिकटवायची झाली की फेव्हिकॉलचा वापर करतात.
11 / 11
यानंतर पीडीलाईटने फेव्हीक्विक, एम-सील बाजारात आणले. ही उत्पादने शेतीसाठी पाईपलाईन, घरात कोणताही वस्तू तुटली की चिकटवण्यासाठी सर्रास वापरली जातात. ये दिवार तुटती क्यू नही है, फेव्हिकॉल का जोड है, सारख्या जाहिरातींनी तर धुमाकूळ घातलेला असतो. अशा या बळवंत पारेख यांचे 2013 मध्ये निधन झाले. परंतू ते आपल्यामागे अखंड भारताला जोडणारे फेव्हिकॉल भेट देऊन गेले.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी