शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आईला गमावल्यावर 'ऑक्सीजन ऑटो' ने वाचवला ८०० लोकांचा जीव, सीता देवीची प्रेरणादायी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 12:44 PM

1 / 5
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत लोकांना फार जास्त त्रास सहन करावा लागला. ऑक्सीजन न मिळाल्याने हॉस्पिटल, रस्ते आणि फुटपाथवर मरणाऱ्या लोकांचे फोटो घाबरवत होते. लोक ऑक्सीजनसाठी इकडे-तिकडे फिरत होते. अशात ऑक्सीजन न मिळाल्याने अनेकांनी आपल्या आप्तांना गमावलं. चेन्नईची सीता देवी सुद्धा यातील एक आहे. ऑक्सीजन न मिळाल्याने तिने तिच्या आईला गमावलं. पण त्यांच्या हिंमतीने आणि इच्छाशक्तीने ८०० लोकांचा जीव वाचवला.
2 / 5
चेन्नईची राहणारी ३६ वर्षीय सीता देवीची ६५ वर्षीय आई विजया डायलिसिसची रूग्ण होती. त्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत Covid 19 ची लागण झाली होती. अशात सीता लगेच आईला राजीव गांधी सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. जिथे ऑक्सीजन बेड रिकामा नसल्याने काही तास हॉस्पिटलबाहेर त्यांना वाट पाहण्यास सांगण्यात आलं.
3 / 5
सीता देवी यांनी Life Beyond Number ला सांगितलं की, 'आम्हाला आईसाठी एका ऑक्सीजन बेडसाठी १२ तास वाट बघावी लागली. इथे अॅम्बुलन्समधील ऑक्सीजन लेव्हल कमी होत असल्याने तिला पुन्हा पुन्हा दुसऱ्या अॅम्बूलन्स शिफ्ट करत होतो. अखेर व्हायरसने तिचा जीव घेतला. जर माझ्या आईला ऑक्सीजन मिळालं असतं तर तिचा जीव वाचला असता. दुसऱ्यांनाही या गोष्टीचा सामना करावा लागू नये असं मला वाटत होतं. त्यामुळे मी ऑटोरिक्षामधून हॉस्पिटलबाहेर ऑक्सीजन पोहोचवणं सुरू केलं.
4 / 5
सीता देवी यांनी लोकांची मदत करण्याचा निश्चय केला आणि मे महिन्यात आपल्या ऑक्सीजन ऑटोच्या माध्यमातून ८०० लोकांचा जीव वाचवला. इतकंच नाही तर ही सेवा त्यांनी गरजू लोकांना फ्रीमध्येही दिली. त्यासोबतच सीता एक एनजीओही चालवतात. त्यातूनच त्यांनी एक ऑटोरिक्षा जमवला. त्यानंतर ऑक्सीजन सिलेंडर आणि फ्लो मीटर लावून शेकडो लोकांचे प्राण वाचवले.
5 / 5
या कामात २ वॉलेंटिअर्सने सीताला साथ दिली. ज्यांच्या मदतीने त्या राजीव गांधी सरकारी हॉस्पिटलसमोर सकाळी ८ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत गरजू लोकांना ऑक्सीजन पुरवत होत्या. यादरम्यान त्या दररोज साधारण २५ ते ३० लोकांची मदत करत होत्या.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्या