10 most expensive cities in the world according to economist
जगात या शहरांमध्ये पाय ठेवण्यापुर्वी दहा वेळा विचार करा, इतके महागडे की त्याएवजी सोन स्वस्त By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 8:09 PM1 / 10The Economist या प्रसिद्ध मासिकाने जगामध्ये राहण्याच्या खर्चावर एक सर्वेक्षण केलं होतं त्यात जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी घोषित केली होती. त्यात यंदा तेल अवीवने पॅरिसला मागे टाकत पहिले स्थान पटकावलं आहे. 2021 च्या या सर्वेक्षणात राहणीमानातील खर्चाच्या आधारावर 173 शहरांचा अभ्यास करण्यात आला होता.2 / 10सप्लाय चेनमधील आलेल्या समस्यांमुळे राहणीमानाच्या खर्चात या वर्षी मोठी वाढ झाल्याचं या अभ्यासात आढळून आलं आहे. कोरोना महामारी थांबवण्यासाठी सुरू केलेल्या उपाययोजनांचा उत्पादन आणि व्यापार या दोन्हींवर परिणाम झाला. या यादीत दुसरे स्थान पॅरिसचे आहे जे मागील वर्षी अव्वल होते. फ्रान्सची राजधानी फार पूर्वीपासून जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. त्यानंतरही येथे पर्यटकांची आवक कमी झालेली नाही.3 / 10पॅरिसप्रमाणेच सिंगापूर हे देखील जगभरातील पर्यटकांसाठी आवडत्या शहरांपैकी एक आहे जे खूप महाग आहे. त्यामुळे पॅरिसनंतर सर्वात महागड्या शहरांमध्ये सिंगापूरने स्थान मिळवलं आहे. सिंगापूर हे आग्नेय आशियाचे आर्थिक केंद्र मानलं जातं. येथील कायदे अतिशय कडक आहेत. त्यामुळे येथे दरोड्यासारख्या घटना नगण्य आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने जगातील अव्वल शहरांमध्येही त्याचा समावेश होतो.4 / 10जगातील अनेक लोक हे स्वित्झर्लंडला पर्यटनाचं नंदनवन मानतात याचं कारण या ठिकाणचं सौंदर्य आहे. स्वित्झर्लंडमध्ये राहणं आजही खूप महाग आहे. त्यामुळे झुरिच शहरही पर्यटकांना राहण्यासाठी महाग पडतं. गेल्या काही वर्षांत येथे राहण्याचं भाडं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे कारण या शहरात फारच कमी अपार्टमेंट्स आहेत. हे स्वित्झर्लंडमधील सर्वात मोठे शहर तसेच एक प्रमुख व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्रही आहे.5 / 10हाँगकाँग हे जगातील अशा काही शहरांपैकी एक आहे जिथं पूर्व आणि पाश्चात्य संस्कृतीचे मिश्रण पाहायला मिळतं. ब्रिटनची वसाहत झाल्यानंतर आता तो चीनचा विशेष प्रशासकीय प्रदेश मानला जातो. येथे राहणे खूप महाग होत आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. दाट लोकवस्तीच्या या शहरात उंच इमारतींनंतरही भाडे खूप जास्त आहे. महागड्या शहरांमध्ये हाँगकाँग पाचवे सर्वात महागडे शहर आहे.6 / 10जगातील महागड्या शहरांमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर सहाव्या क्रमांकावर आहे. हे शहर सर्वात महागडे शहर असल्याचे म्हटलं जातं. येथे भाड्यानं घर मिळणे खूप कठीण आणि महाग आहे. हे एक प्रमुख व्यावसायिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन केंद्र आहे ज्याचा जगभरात प्रभाव पडतो.7 / 10स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरात अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची मुख्यालयं असण्यामुळे हे शहर जगभरात प्रसिद्ध आहे. फ्रान्सच्या सीमेलगतच असल्यामुळं येथे फ्रेंच भाषा बोलणारे लोक जास्त आहेत. आणि जिनिव्हाची गणना जगातील शीर्ष आर्थिक शहरांमध्ये केली जाते.8 / 10डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन हे जगातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे. परंतु ते खूप महाग आहे. या देशात अन्न, दारू आणि घरगुती वस्तू या युरोपियन युनियनच्या इतर देशांच्या तुलनेत सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक महाग आहेत.9 / 10लॉस एंजेलिस हे अमेरिकेतील दुसरे शहर आहे जे खूप महाग आहे. महागाईच्या बाबतीत न्यूयॉर्कनंतर या शहराचा क्रमांक येतो. कारण या शहरात हॉलीवूडमधील स्टार अभिनेते राहतात. हे शहर जगातील प्रमुख मनोरंजन केंद्र मानले जाते. महागड्या शहरांच्या यादीत लॉस एंजेलिस नवव्या क्रमांकावर आहे.10 / 10महागड्या शहरांच्या यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये दहावे स्थान जपानमधील ओसाका शहराचे आहे. जपानची राजधानी टोकियो नंतर हे दुसरे मोठे आर्थिक केंद्र मानलं जातं. या शहरात राहणं खूप महाग आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications