11 American fighter jets flying in South china Sea; Chinese army kept watching
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 6:42 PM1 / 10दक्षिण चीन समुद्रामध्ये अमेरिकेने युद्धाभ्यास सुरु केला आहे. याचबरोबर अमेरिकन नौदलाने फुत्कारणाऱ्या चीनला जशासतसे प्रत्यूत्तर दिला आहे. चीनच्या धमकीनंतरही अमेरिकेच्या 11 लढाऊ विमानांनी दक्षिण चीन समुद्राच्या वादग्रस्त भागावर उड्डाण केले. ही विमाने चीनचे सैनिक केवळ पाहतच राहिले. 2 / 10अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी उड्डाण केल्यानंतर चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने शक्तीचे खुले प्रदर्शन केले अशी टीका केली आहे. रविवारी ग्लोबल टाईम्सने अमेरिकेला इशारा दिला होता. 3 / 10चीनच्या समुद्रात आलात तर याद राखा, असा इशारा ग्लोबल टाईम्सने ट्विट करून दिला होता. यामध्ये चीनची क्षेपणास्त्रे आणि युद्धनौकांचा फोटो वापरण्यात आला होता. यावर अमेरिकेच्या सैन्याने मजेशीर ट्विट करत तरीही आम्ही इथेच आहोत आणि राहणार असे ट्विट करत आव्हान दिले होते. 4 / 10यानंतर आज अमेरिकेने आक्रमक होत चीन दावा करत असलेल्या समुद्रावर घिरट्या घातल्या. अमेरिकी नौदलाच्या ताफ्यात अणुबॉम्ब वाहून नेऊ शकणारी विमाने आहेत. ही विमाने असलेल्या दोन युद्धनौका अमेरिकेने चीनच्या समुद्रात तैनात केल्या आहेत. 5 / 10B-52H हे बॉम्बवर्षाव करणारे विमान अणुबॉम्ब टाकू शकते. या विमानासह अमेरिकेच्या 10 लढाऊ विमानांनी उड्डाण केले. ही सर्व विमाने अमेरिकेची युद्धनौका निमित्जवरून उडाली होती. यूएसएस निमित्ज आणि यूएसएस रोनाल्ड रीगन विमानवाहू युद्धनौका या युद्धाभ्यासामध्ये आहेत. 6 / 10यावर चीन खवळला असून ग्लोबल टाईम्सने टीका करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटॅगॉनने अण्वस्त्र वाहू विमाने B-52H गुआममध्ये तैनात करणे आणि युद्धाभ्यास करणे म्हणजे चीनला आपली ताकद दाखविणे आहे. 7 / 10चीनने तैवानला घाबरविण्यासाठी 70 दिवसांचा मोठा युद्धाभ्यास सुरु केला आहे. हा युद्धाभ्यास 31 जुलैपर्यत चालणार आहे. 8 / 10बोहाई समुद्रामध्ये तैवानवर ताबा मिळविण्यासाठी सर्वात चांगली जागा असल्याचे मानले जात आहे.येथील आणि तैवानच्या खाडीतील समुद्री परिस्थिती सारखीच आहे. यामुळे चीनचे हे पाऊल खूप खतरनाक आहे.चीनी सैन्य बेटांवर कब्जा करणे, तेथे सैन्याच्या चौक्या स्थापन करणे आणि अँटी एअर आणि अँटी मिसाईलचा अभ्यास करणार आहे. यासाठी चीनने बोहाई समुद्रामध्ये २००० किमींचे क्षेत्र बंद केले आहे.9 / 10चीनच्या कुरापती पाहून अमेरिकेने तातडीने तीन मोठ्या विनाशकारी युद्धनौका तैनात केल्या आहेत. तसेच प्रशांत महासागरात काही लढाऊ विमानवाहू युद्धनौका रवाना केल्या होत्या. या युद्धानौकांनी चीनच्या समुद्रात तळ ठोकला असून युद्धसराव सुरु केला आहे. 10 / 10तैवानच्या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोकेमिकल आणि अन्य मिनरलचा मोठा साठा आहे. तैवानवर कब्जा केल्यास या भागात एक मोठा न्युक्लिअर रिएक्टरही निर्माण करण्याची चीनची योजना आहे. आता जागतिक तज्ज्ञांनुसार साऊथ चायना समुद्रात युद्धासारखी परिस्थिती तयार होणार आहे. यामध्ये चीनविरोधात तैवानच्या बाजुने अमेरिकाच नाही तर रशियाही सहभागी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications