The 11 presidents have seen the Taj Mahal before Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापूर्वी 'या' 11 राष्ट्रप्रमुखांनी पाहिलाय ताजमहाल! By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 3:47 PM1 / 11डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी भारतानंही तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प ताजमहाल पाहायला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वीसुद्धा 11 देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी ताजमहाल पाहिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पत्नीसह ताजमहाल पाहिला आहे. 2 / 11बुल्गेरियाचे माजी पंतप्रधान सर्जे स्टॅनिशेव 15 सप्टेंबर 2007मध्ये ताजमहाल पाहिला होता. ताजमहालच्या समोर त्यांनी एक फोटोसुद्धा काढला होता. 3 / 11इस्राएलचे राष्ट्राध्यक्ष रियूवेन रिवलिन आणि त्यांची पत्नी नेचामासह प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहालसमोर फोटो खेचले आहेत. 4 / 1126 जानेवारी 2008मध्ये फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोजीसुद्धा ताजमहाल पाहण्यासाठी आले होते. 5 / 1117 फेब्रुवारी 2018ला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीसुद्धा कुटुंबीयांसह ताजमहाल पाहिला होता. 6 / 11ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर मेसियस बोलसोनारोच्या कुटुंबीयांसह 27 जानेवारी 2020ला ताजमहाल पाहण्यासाठी गेले होते. 7 / 11चीनचे माजी राष्ट्रपती हू जिंताओ यांनी आपल्या पत्नीसह 22 नोव्हेंबर 2006ला ताजमहाल पाहिला होता. 8 / 11अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश (सीनियर बुश) 13 मार्च 1984मध्ये भारताच्या यात्रेदरम्यान ताजमहाल पाहण्यासाठी पोहोचले होते. 9 / 11तुर्कीचे माजी पंतप्रधान बुलेंट एसेविट (Bulent Ecevit) आणि त्यांची पत्नी रहसन (Rahsan) यांनी 2 एप्रिल 2002ला ताजमहालच्या समोर फोटो काढले होते. 10 / 11अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची मुलगी चेल्सिया यांच्याबरोबर 22 मार्च 2000ला ताजमहाल पाहिला होता. यावेळी चिल्सियाचा 14वा वाढदिवस होता. 11 / 11अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ताजमहाल पाहून झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावर ओबामा भारतात आले होते. ओबामा आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा आग्राचा प्रवास केला होता. परंतु सौदी अरेबियाचे शाह अब्दुल्ला यांच्या निधनानंतर त्यांना दौरा अर्धवट सोडून परतावं लागलं. आणखी वाचा Subscribe to Notifications