12th century lewis chess piece sold at 6 crore
बुद्धीबळाच्या या मोहऱ्याला 55 वर्षांपूर्वी 415 रुपयांना खरेदी केले होते; आता 6 कोटींना लिलाव By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 3:48 PM1 / 7लंडनमध्ये 2 जुलैला 12 व्या शतकातील बुद्धीबळाच्या मोहऱ्याचा लिलाव झाला. 55 वर्षांपूर्वी या मोहऱ्याला 6 डॉलर म्हणजेच 415 रुपयांमध्ये खरेदी केले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या लिलावामध्ये या मोहऱ्याला 6 कोटी रुपये मोजले आहेत2 / 7हा मोहरा स्कॉटलंडच्या एका व्यक्तीने 1965 मध्ये घेतला होता. त्याच्या कुटुंबियांना गेल्या महिन्यातच हा मोहरा कपाटात मिळाला होता. 3 / 7आर्ट डीलर कंपनी सोदबीद्वारे या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोहरा घेणाऱ्याचे नाव उघड झालेले नाही. 4 / 7हा मोहरा गेल्या 55 वर्षांपासून कपाटातच ठेवलेला होता. आजोबांच्या मृत्यूनंतर आजीने हा मोहरा संपत्ती म्हणून कुटुंबियांच्या ताब्यात दिला होता. हा 12 व्या शतकातील मोहरा आहे, असे या कुटुंबातील सदस्याने सांगितले. 5 / 7हा मोहरा 3.5 इंच उंचीचा आहे. दाढी असलेल्या या मोहऱ्यावर उजव्या हातात तलवारसारखे हत्यार आहे आणि डाव्या हातात ढाल आहे. या लिलावात या मोहऱ्याला 7 कोटी येण्याची अपेक्षा कुटुंबाला होती. 6 / 7जानकारांनुसार हा मोहरा त्या 93 मोहऱ्यांपैकीच आहे, जे 1831 मध्ये मिळाले होते. हे मोहरे 12 किंवा 13 व्या शतकात बनविण्यात आल्याचा अंदाज आहे. हे सर्व मोहरे वॉलरसच्या दातापासून बनविण्यात आले आहेत.7 / 7लंडनच्या ब्रिटीश म्युझियममध्ये 82 आणि स्कॉटलंडच्या नॅशनल म्युझियममध्ये 11 मोहरे ठेवण्यात आले आहेत. हे मोहरे नॉर्वेमध्ये मिळाले होते. यातील पाच मोहरे अद्याप गायब आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications