२०० टन सोने, लग्झरी कार, बंगले अन्...; असद यांच्या संपत्तीचे आकडे पाहून डोळे दिपतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 10:18 IST
1 / 9सीरिया (Syria) मध्ये इस्लामिक कट्टरपंथींच्या विद्रोहानंतर बशर अल असद यांनी देश सोडून पलायन केले आहे. १३ वर्ष चाललेल्या गृहयुद्धात अखेर बंडखोर इस्लामिक समूह हयात तहरीर अल शामच्या नेतृत्वात सत्तापालट झाला आहे. युद्धावेळी राष्ट्रपतिपदावरून हटवले गेलेले बशर अल असद यांनी देशातून पलायन करत रशियात आश्रयाला गेले.2 / 9देश सोडून पळणारे असद हे बेसुमार संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याकडे शेकडो टन सोन्यासह अमेरिकन डॉलर आणि यूरोचं मोठं भंडार आहे. असद यांनी सीरियातून पलायन करताना त्यांनी रशियाच्या मॉस्कोकडे जाण्याचा निर्णय घेतला. रविवारी ८ डिसेंबरला रशियाच्या लष्करी विमानाने लटाकिया येथून उड्डाण केले आणि ते मॉस्कोला पोहोचले.3 / 9२०११ मध्ये सिरियात बंडखोरी सुरू झाली, जेव्हा असद सरकारने लोकशाही समर्थक निदर्शने क्रूरपणे चिरडली. हा संघर्ष हळूहळू गृहयुद्धात बदलला ज्यामध्ये अनेक बंडखोर गट असद सरकारच्या विरोधात उठले. सरतेशेवटी, या १३ वर्षांच्या संघर्षामुळे असद राजवट खाली आली. दमास्कस काबीज करून बंडखोर गटांनी असद सरकारची केवळ हकालपट्टीच केली नाही, तर सीरियन लोकांनाही नव्या सुरुवातीची संधी दिली. 4 / 9आपल्या देशातून पळून गेलेल्या असद यांच्याकडे अमाप संपत्ती आहे आणि रिपोर्टनुसार त्यांनी अनेक किलो सोने आणि पैसा सोबत नेला आहे. एकीकडे देशातील ९० टक्के लोकांना गरिबीत जगावे लागत आहे तर दुसरीकडे सौदी वृत्तपत्र ऐलावच्या मते, राष्ट्रपती बशर अल-असद यांचे कुटुंब खूप श्रीमंत आहे. 5 / 9Elaw च्या रिपोर्टमध्ये ब्रिटिश इंटेलिजेंस सर्व्हिसेस MI6 च्या माहितीचा हवाला देत असं म्हटलं आहे की, गेल्या वर्षी २०२३ पर्यंत राष्ट्रपतींच्या कुटुंबाच्या एकूण संपत्तीमध्ये सुमारे २०० टन सोन्यासह अब्जावधी डॉलर्स आणि युरोचा समावेश होता.6 / 9२०० टन सोन्याच्या साठ्याशिवाय राष्ट्रपती असद यांच्याकडे १६ अब्ज डॉलर्स (सुमारे १.३५ लाख कोटी रुपये) आणि ५ अब्ज युरो (सुमारे ४४,५९४ कोटी रुपये) संपत्ती होती. याशिवाय असद यांच्याकडे एक आलिशान घर आणि महागड्या आणि आलिशान गाड्यांचं मोठ्या प्रमाणात कलेक्शन आहे. 7 / 9असद यांच्या श्रीमंतीची एक झलक त्यांच्या ताफ्यात दररोज पाहायला मिळत होती. त्याच्या ताफ्यात रोल्स रॉयस फँटम, ॲस्टन मार्टिन डीबी7 पासून ते फेरारी एफ40, फेरारी एफ430 आणि मर्सिडीज बेंझ, ऑडी या गाड्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येते. बशर अल-असद यांची एकूण संपत्ती सीरियाच्या ७ वर्षांच्या बजेटइतकी होती. मात्र, यापैकी किती मालमत्ता किंवा सोने, डॉलर किंवा युरो असाद देशातून पळून गेला हे स्पष्ट झालेले नाही.8 / 9बशर अल-असद यांच्याकडे सीरियामध्ये अमली पदार्थांचं मोठं नेटवर्क आहे. ज्यामुळे असद सरकारला अब्जावधी डॉलर्सची कमाई झाली. या ड्रग्सचं नाव 'कॅप्टागनट' आहे आणि जगातील त्याचे ८०% उत्पादन फक्त सीरियामध्ये आहे असा दावा अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. 9 / 9सीरिया देखील या ड्रग्सचं सर्वात जास्त निर्यात करते आणि इस्रायली वेबसाइट वायनेटच्या मते असद सरकार याद्वारे दरवर्षी सुमारे ५ अब्ज डॉलर्स कमवते. कॅप्टागनटच्या माध्यमातून केवळ असद कुटुंबीयच नव्हे तर सीरियन लष्करातील उच्च अधिकारीही प्रचंड कमाई करत होते.