33 ancient viruses found in 15000 year old ice in China, scientists were shocked
China Virus: 15000 वर्षे जुन्या बर्फात सापडले 33 प्राचीन व्हायरस, शास्त्रज्ञही झाले चकीत... By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 6:00 PM1 / 8 कोरोना व्हायरसने जगभर हाहाःकार माजवला आहे. जगभर कोरोना पसरल्यापासून अनेक शास्त्रज्ञ पृथ्वीवर असलेल्या विविध विषाणूंवर परिक्षण करुन नव-नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.2 / 8 पण, अजूनही आपल्या शास्त्रज्ञांना या पृथ्वीवर असलेल्या सर्व विषाणूंबद्दल माहिती मिळाली नाहीये. नुकत्याच झालेल्या एका शोधातून हे सिद्ध झालंय.3 / 8या शोधादरम्यान शास्त्रज्ञांना चीनच्या तिबेटमध्ये 15 हजार वर्षे जुन्या बर्फामध्ये प्राचीन जिवंत विषाणू सापडले आहेत.4 / 8 हे विषाणू आतापर्यंत जगभरात आढळलेल्या विषाणूंपेक्षा वेगळे असून, इतक्या वर्षांपासून बर्फात असल्यामुळे हे अजूनही जिवंत आहेत. 5 / 8 संशोधकांनी सांगितले की, त्यांना हा व्हायरस तिबेटमधील अतिशय जुन्या बर्फाच्या डोंगरावर आढळला असून, त्या ठिकाणी या विषाणूची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे.6 / 8 या शोधाचा अहवाल मायक्रोबायोम जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या शोधातून शास्त्रज्ञांना विषाणूंच्या विकासाची महत्वपूर्ण माहिती मिळू शकेल.7 / 8 या शोधाचे प्रमुख लेखक आणि ओहियो स्टेट यूनिवर्सिटीचे संशोधक ब्रिड पोलर आणि क्लाइमेट रिसर्च सेंटरचे संशोधक झी-पिंग झोंग यांनी सांगितले की, पश्चिम चीनमधील बर्फाचा आतापर्यंत अभ्यास करण्यात आलेला नाही. या शोधातून अतिशय महत्वाची माहिती मिळू शकेल. 8 / 8 हे विषाणून समुद्र सपाटीपासून 22 हजार फुट उंचीवर असलेल्या बर्फात आढळले आहेत. संशोधकांना त्या ठिकाणी 33 प्रकारचे व्हायरस सापडले असून, सध्या या व्हायरसपासून किती धोका आहे हे येणाऱ्या काळात कळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications