शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सौदीतील भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ, डिटेंशन सेंटरमध्ये पाठविले

By ravalnath.patil | Published: September 21, 2020 4:27 PM

1 / 10
कोरोना व्हायरचा सौदी अरबियातील भारतीय कामगारांनाही फटका बसला असून बेरोजगारीमुळे आणि कामाच्या परवान्याची मुदतही संपल्याने ४५० भारतीय कामगारांवर जगण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली.
2 / 10
यातील बहुतेक कामगार तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, काश्मीर, बिहार, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, हरियाणा, पंजाब आणि महाराष्ट्रातील आहेत. नोकरी गमावल्यामुळे या कामगारांना भीक मागण्यास भाग पडावे लागत आहे.
3 / 10
भीक मागितली, हा गुन्हा आहे, असे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कामगार म्हणतात. सौदी प्रशासनाने त्याच्या भाड्याच्या खोलीत जाऊन त्यांची ओळख पटवली आणि त्यांना जेद्दाहस्थित डिटेंशन सेंटरमध्ये ठेवले.
4 / 10
डिटेंशन सेंटरमधील कामगारांमध्ये उत्तर प्रदेशमधील १०, बिहारमधील १०, तेलंगणामधील पाच आणि महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकमधील चार कामगार आहेत. एक आंध्र प्रदेशचा आहे.
5 / 10
कोरोना विषाणूच्या साथीमुळे सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेलाही वाईट परिणाम झाला असून येथे काम करणारे परदेशी कामगारही बेरोजगार झाले आहेत.
6 / 10
येथील सर्वा कामगार हताश झाले आहेत. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. आमच्या परिस्थितीमुळे आम्हाला भीक मागावी लागली. कारण आमची नोकरी गेली आहे. आता आम्ही डिटेंशन सेंटरमध्ये पडून आहोत, असे एका कामगाराने सांगितले.
7 / 10
आणखी एक कामगार म्हणाला, 'आम्ही गेल्या चार महिन्यांपासून बऱ्याच अडचणींचा सामना करत होतो. आम्ही पाहिले आहे की, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया आणि श्रीलंका येथील कामगार आपल्या देशाकडून मदत घेत मिळत असून त्यांना परत पाठवले जात आहे आणि आम्ही येथे अडकलो आहोत.
8 / 10
'स्थानिक प्रशासनाला समजले की, या कामगारांच्या वर्क परमिटची मुदत संपली आहे आणि त्यांना बेकायदेशीररित्या ठेवण्यात आले आहे, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे सामाजिक कार्यकर्ते आणि एमबीटी नेते अमजद उल्लाह खान यांनी सांगितले.
9 / 10
व्हायरल व्हिडिओमध्ये एक कामगार म्हणतो, माझ्या भावाचे निधन झाले आहे आणि माझ्या आईची प्रकृती चिंताजनक आहे. मला परत भारतात जायचे आहे. अमजद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी आणि सौदी अरेबियामध्ये भारतीय राजदूत असुफ सय्यद यांना ४५९ भारतीय कामगारांच्या स्थितीबाबत एक पत्र लिहिले गेले असून केंद्र सरकारने त्यांना भारतात आणण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.
10 / 10
परराष्ट्र मंत्रालयाच्या हेल्पलाईन प्रवासी भारतीय सहायता केंद्राने अमजद उल्लाह खानच्या ट्विटला प्रत्युत्तर देत सर्व स्थलांतरितांची माहिती मागितली आहे. अहवालानुसार, २.४ लाख भारतीयांनी भारतात परतण्यासाठी नोंदणी केली होती. मात्र, आतापर्यंत केवळ ४०,००० भारतीय परत येऊ शकले आहेत.
टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाIndiaभारत