800 year old mummy found in Peru with vegetables and utensils
तब्बल ८०० वर्ष जुना मानवी सांगाडा सापडला, सोबत होत्या भाज्या अन् भांडी, नेमकं रहस्य काय? By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 4:23 PM1 / 5पेरू या देशातील लीमा शहराच्या परिसरात 800 वर्षांपूर्वीच्या एका mummy चा म्हणजेच मानवी सांगाड्याचा शोध लागला आहे. त्याचबरोबर या mummy बरोबर भाजीपाला आणि काही हत्यारंदेखील सापडली आहेत.2 / 5Archaeologist पीटर वान डेलन लूना यांनी याविषयी बोलताना म्हटलंय की ही ममी लीमा क्षेत्रात शोधली गेली होती. आता हा मानवी सांगाडा पुरूषाचा आहे की स्त्रीचा हे अजून स्पष्ट झालेलं नाही.3 / 5या ममीच्या पूर्ण शरीराला दोरीनं बांधण्यात आलं आहे आणि चेहरा झाकण्यात आला आहे. ही त्या काळातील अंत्यसंस्कारांची पद्धत असू शकते. असं स्टेट यूनिवर्सिटी ऑफ सॅन मार्कोसचे वॅन डालन लूना यांनी म्हटलं आहे.4 / 5लीमा शहराच्या आसपासच्या परिसरात जमिनीखाली ही ममी सापडली आहे. त्यात चीनी मातीच्या वस्तू आणि दगडी हत्यारंदेखील सापडली आहेत.5 / 5पेरू हा देश इंका साम्राज्याच्या आधी आणि नंतर शेकडो आर्कियोलॉजिक स्थानांचं घर राहिलेलं आहे. त्याचा प्रभाव हा दक्षिणी इक्वाडोर आणि कोलंबियापासून तर मध्य चिली पर्यंत तब्बल ५०० वर्ष होता. आणखी वाचा Subscribe to Notifications