शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

९/११ चे ३ दहशतवादी हल्ले २९९६ लोकांचा बळी; १९ वर्ष जुन्या घटनेचे आजही हादरवणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 5:51 PM

1 / 7
महासत्ता अमेरिकेसारख्या देशाला हादरवून टाकणारी घटना १९ वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेनं संपूर्ण जग अस्वस्थ झाले होते. २००१ मध्ये अल-कायदाच्या 19 दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर, पेंटागॉन आणि पेनसिल्व्हानिया या महत्त्वाच्या इमारतींमध्ये एकाच वेळी दहशतवादी हल्ला केला.
2 / 7
दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमानांना वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवरवर धडक दिली. तिसऱ्या विमानाने पेंटागॉनवर हल्ला केला, तर चौथे विमान पेनसिल्व्हानियामध्ये कोसळले होतं.
3 / 7
दहशतवाद्यांनी जवळपास ४ प्रवासी विमान हायजॅक केली. यातील ३ विमानं तीन वेगवेगळ्या इमारतींमध्ये घुसवली.
4 / 7
हा हल्ला इतका भयावह होता की २ हजारांपेक्षा मृतदेहांपैकी केवळ २९१ मृतदेह चांगल्या स्थितीत होते.
5 / 7
या हल्ल्यामागे अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा हात होता.
6 / 7
२ मे २०११ रोजी, अमेरिकेने सूड म्हणून पाकिस्तानच्या अॅबोटाबादमध्ये ओसामाची हत्या केली. १३ वर्षांनंतर नवीन इमारत तेथे काम करण्यासाठी खुली करण्यात आली. ही नवीन इमारत तब्बल १०४ मजल्यांची आहे.
7 / 7
ही इमारत फक्त न्यूयॉर्क किंवा मॅनहॅटनमध्येच नाही तर अमेरिकेतील सर्वात उंच इमारतींमध्ये आहे. वन वर्ल्ड ट्रेड सेंटर असं नाव या इमारतीला देण्यात आलं असून ही इमारत तयार करण्यासाठी आठ वर्षांचा काळ लागला. ही इमारत उभारण्यासाठी सुमारे अडीच लाख कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.
टॅग्स :AmericaअमेरिकाTerror Attackदहशतवादी हल्ला