9-year-old Chimukalya loses mother in rocket attack on Israel, says embassy
रॉकेट हल्ल्यात 9 वर्षीय चिमुकल्यानं गमावली आई, दूतावासाकडून हळहळ व्यक्त By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 3:49 PM1 / 12इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. हमासने इस्रायलच्या (Israel) दिशेने क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. 2 / 12हमासने इस्रायलवर 130 रॉकेट डागली असून आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात एका भारतीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला मूळ केरळची असल्याची माहिती आहे. इस्रायलनेही हमासला चोख प्रत्युत्तर दिलंय. 3 / 12इस्रायलमध्ये राहणारी केरळची महिला फिलिस्तानी रॉकेट हल्ल्यात मृत्यूमुखी पडली आहे. अश्केलोन शहरातील 31 वर्षीय सौम्याच्या घरावर हमासने टाकलेले रॉकेट पडले. 4 / 12केरळमध्ये असलेल्या आपल्या पतीला व्हिडिओ कॉलद्वारे सौम्या बोलत असतानाच ही दुर्घटना घडल्याचे तिच्या दीराने पीटीआयशी बोलताना सांगितले. 5 / 12गेल्या 7 वर्षांपासून सौम्या या इस्रायलमध्ये घरेलू कामगार म्हणून काम करत होत्या. हमासने केलेल्या हल्ल्यात 10 लहान मुले आणि एक महिलेसह 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर 152 नागरिक जखमी झाले आहेत. 6 / 12केरळच्या इडुक्कीमधील किरीथोडू येथील रहिवाशी असलेल्या सौम्या यांच्या घराजवळील फोटो मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यांच्या घराबाहेर शांतता दिसून येत आहे. 7 / 12मी नुकतेच सौम्या संतोष यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला, तसेच या हल्ल्यात त्यांनी आपला जीव गमावला त्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वनही केलं. 8 / 12इस्रायलमधील भारताचे दूत रॉन मालका यांनी पीडित कुटुंबीयांशी संवाद साधून संपूर्ण देशाला या घटनेनं दु:ख झाल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही येथे आपल्या कुटुंबीयांसाठी असल्याचंही ते म्हणाले.9 / 12सौम्या यांना अडोन हा 9 वर्षांचा मुलगा असून आईच्या निधानामुळे तो पोरका झाला आहे. याबद्दलही इस्रायलने दुख व्यक्त केलं आहे. तसेच, या हल्ल्यामुळे आपणास 2008 च्या 26/11 मुंबई हल्ल्याची आठवण झाल्याचंही ते म्हणाले. 10 / 12मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातही अशाचप्रकारे निष्पाप नागरिक मारले गेले होते. याही हल्ल्यात अनेकांनी आपल्या आई-वडिलांना गमावलं होतं, असेही 11 / 12दरम्यान, जेरूसलेमच्या अक्सा मशिदीबाहेर सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यामध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत. 12 / 12त्यानंतर हमास संघटनेने इस्रायलला प्रत्युत्तर देण्याची भाषा सुरु केली. इस्रायलने जेरूसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications