जमिनीखाली सापडला उर्जेचा मोठा स्रोत, केवळ २% गॅसमधून २०० वर्षे संपूर्ण जगाला मिळेल वीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 20:07 IST
1 / 4जमिनीच्या पृष्टभागाखाली हायड्रोजनचा पर्वत सापडला आहे. तज्ज्ञांच्या मते याचा अगदी थोडासा भाग जरी वापर केली तरी २०० वर्षांपर्यंत पेट्रोल-डिझेलसारख्या खनिज तेलाची आवश्यकता भासणार नाही. आपल्या पृथ्वीच्या पृष्टभागाखाली हा तब्बल ६.३ लाख कोटी टन एवढा हायड्रोजनचा साठा आहे. हा हायड्रोजन दगड आणि भूमिगत रिजवॉयरमध्ये आहे. 2 / 4हा हायड्रोजन पृथ्वीवर असलेल्या तेलाच्या साठ्यापेक्षा २६ पट अधिक आहे. मात्र तज्ज्ञांना या हायड्रोजनच्या साठ्याच्या निश्चित ठिकाणाचा शध लागलेला नाही. तसेच ज्या साठ्यांचा शोध लागला आहे, ते समुद्र किनाऱ्यापासून खूप दूर अंतरावर आहेत. तसेच त्यापैकी काही खूप खोलवर आहेत. तसेच त्यांचं प्रमाणही फारसं नाही, अशा परिस्थितीत इथून हायड्रोजन बाहेर काढणं परवडणारं ठरणार नाही. 3 / 4यूएसजीएसचे पेट्रोलियम जियोकेमिस्ट ज्येफ्री एलिस यांनी सांगितले की, हायड्रोजनचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हा क्लीन एनर्जीचा फार मोठा स्रोत आहे. खासकरून त्या माध्यमातून वाहन चालवणं फायदेशीर ठरणार आहे. त्याशिवाय त्यामधून वीज उत्पादनही करता येऊ शकतं. एवढ्या मोठ्या हायड्रोजनच्या साठ्यामधील केवळ दोन टक्के भाग जरी वापरात आणला तरी जगाला २०० वर्षांपर्यंत नेट झीरो उत्सर्जनापर्यंत नेता येऊ शकतं. म्हणजेच त्यामधून कुठलंही प्रदूषण होणार नाही. 4 / 4तर जियोलॉजिस्ट सारा जेलमेन यांनी सांगितले की, खनिज तेलाच्या मात्रेएवढ्या हायड्रोजनमधून दुप्पट उर्जा मिळते. सारा आणि ज्योफ्री यांनी केलेलं अध्ययन हल्लीच एका नियतकालिकात प्रसिद्ध झालं आहे. हायड्रोजनच्या प्रमाणाचा शोध घेण्यासाठी दोन्ही शास्त्रज्ञांनी पृथ्वीमधून बाहेर येणाऱ्या हायड्रोजनचं एक मॉडेल तयार केलं. त्या माध्यमातून हा शोध लागला.