शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगावर मोठं संकट! ...तर 2030 पर्यंत 'या' आजारानं 30 लाख लोकांचा मृत्यू, तज्ज्ञांचा धडकी भरवणारा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:36 IST

1 / 7
एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार कार्यक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय निधीतील कपात एक मोठे आणि गंभीर संकट निर्माण करू शकते. गुरुवारी (२७ मार्च) लॅन्सेट एचआयव्ही जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार कार्यक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय निधीतमध्ये कपात झाल्यास २०३० पर्यंत १ कोटींहून अधिक संसर्ग आणि जवळजवळ तीस लाख मृत्यू होऊ शकतात.
2 / 7
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील बर्नेट इंस्टिट्यूटच्या संशोधकांनी केलेल्या अध्ययनात, 2026 पर्यंत जागतिक एचआयव्ही नीधीमध्ये अंदाजे 24 टक्के घट होण्याच्या परिणामांचे विश्लेषण केले आहे.
3 / 7
अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलँडसह काही प्रमुख देणगीदारांनी मदतीत 8 ते 70 टक्क्यांपर्यंत कपात जाहीर केल्यानंतर हे अध्ययन समोर आले आहे. हे पाच देश जागतिक एचआयव्ही मदतीच्या ९० टक्क्यांहून अधिक मदत निधी देतात.
4 / 7
लाखो नव्या संसर्गांचा आणि मृत्यूचा धोका - संशोधकांच्या मते, जर अमेरिका आणि ब्रिटनसह संबंधित पाच मुख्य देणगीदार देशांनी प्रस्तावित निधी कपात कमी केली नाही, तर २०२५ ते २०३० दरम्यान ४.४ ते १०.८ मिलियन नवे एचआयव्ही बाधित आणि ७७०,००० ते २.९ मिलियन मृत्यू होऊ शकतात.
5 / 7
एचआयव्ही निधीमध्ये जगातील सर्वात मोठा वाटा असणाऱ्या अमेरिकेने, डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर २० जानेवारी रोजी सर्व प्रकारची मदत थांबवली आहे.
6 / 7
या निधी कपातीमुळे 2030 पर्यंत एचआईवी/एड्स निर्मूलनाच्या दिशेने सुरू असलेल्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो.
7 / 7
अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, उप-सहारा आफ्रिका आणि ड्रग्ज इंजेक्शन घेणारे लोक, लैंगिक संबंध ठेवणारे लोक आणि पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष तसेच मुले आदी सर्वाधिक प्रभावित होतील
टॅग्स :Deathमृत्यूHIV-AIDSएड्सAmericaअमेरिका