सत्य स्वीकारा! CoronaVirus दोन वर्षे नाही जाणारा; अमेरिकेच्या मोठ्या डॉक्टरचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 15:05 IST
1 / 10अमेरिकेच्या मेरीलँड विद्यापीठाच्या हॉस्पिटलमधील साथरोग विभागाचे प्रमुख आणि कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर फहीम युनूस यांनी जगाला इशारा दिला आहे. त्यांनी ट्विट करून कोरोनाशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. 2 / 10युनूस यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे की, मित्रांनो, सत्याचा स्वीकार करा, हेच खोट्या आशेपेक्षा खूप भल्याचे आहे. मी सहानूभूतीपूर्वक कोरोनासंबंधी खरी माहिती शेअर करत आहे. कारण कोरोनाशी लढण्यासाठी आपण एकत्र होऊन योजना बनवू शकू. तयारी करू आणि एकमेकांची मदत करुया. 3 / 10फहीम युनूस यांनी सांगितले की, माझा उद्देश केवळ माणसांची मदत करणे एवढाच आहे. लाईक, रिट्विट यामध्ये अजिबात रस नाहीय. कोरोना संपल्यावर तुम्हाला मी इथे सक्रीय असल्याचे दिसणार नाही. 4 / 10कोरोना व्हायरस पुढील दोन वर्षे जाणारा नाही. कोरोना महामारी दोन वर्षांहून अधिक काळ राहणार आहे. याचे कारणही त्यांनी दिले आहे. 5 / 10कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडून सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. कोरोनाची लस शोधण्यासाठी अद्याप 1 वर्ष अवकाश असल्याचे फहीम यांनी सांगितले. 6 / 10म्हणजेच पुढील वर्षभर कोरोना राहणारच आहे. जरी लस सापडली तरीही तिचे उत्पादन आणि जगभरात वाटप होण्यासाठी कमीतकमी एक वर्ष लागणार आहे. 7 / 10हर्ड इम्युनिटी खूप दूर आहे. महामारीने वेग पकडला आहे. यामुळे लस आल्यानंतर साधारण वर्षभराने कोरोनाचा कहर कमी करून दिलासा मिळण्य़ासाठी दोन वर्षे जाणार आहेत. या हिशोबानेच योजना बनवाय़ला हवी, असे फहीम युनूस यांनी सांगितले आहे. 8 / 10यानंतर फहीम यांनी अमेरिकेतील कोरोना रुग्णांच्या संख्यावरही मत मांडले आहे. अमेरिकेमध्ये 25 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेची प्रमुख आरोग्य संस्था सीडीसीनुसार अमेरिकेमध्ये खरी संख्या ही 10 पटींनी अधिक असू शकते. 9 / 10पाकिस्तानने अमेरिकेपेक्षा 15 पटींनी (प्रति 10 लाख लोक) कमी चाचण्या घेतल्या आहेत. मात्र, तेथे 2 लाख रुग्ण सापडले आहेत. म्हणजे कल्पना करा पाकिस्तानात कोरोना रुग्णांची खरी संख्या किती असू शकते, असे फहीम म्हणाले. 10 / 10दरम्यान, WHO कडून अनेकदा औषध लवकरच येणार असल्याचे सांगितले जात आहे. तर कधी उशीर लागणार असल्याचे सांगितले जात आहे.