शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१००० गर्लफ्रेंड असलेल्या मुस्लिम नेत्याला तब्बल १०७५ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 3:51 PM

1 / 10
तुर्कस्तानमधील मुस्लिमांच्या एका पंथाचा प्रमुख असलेल्या अदनान ओकतारला न्यायालयानं विविध गुन्ह्यांमध्ये १ हजार ७५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
2 / 10
अदनान ओकतार नेतृत्त्व करत असलेला पंथ कट्टर विचारसरणीचा आहे. २०१८ मध्ये देशभरात छापे टाकण्यात आले होते. त्यात ओकतार यांच्या अनेक समर्थकांना अटक करण्यात आली होती.
3 / 10
अदनान ओकतार कट्टर विचारांचा प्रसार, प्रचार करतात. त्यांच्या उपदेशादरम्यान ते महिलांचा उल्लेख मांजरी असा करतात.
4 / 10
अदनान टीव्ही शो दरम्यान प्लास्टिक सर्जरी केलेल्या महिलांसोबत नृत्यदेखील करतात.
5 / 10
अदनान यांच्यावर लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, फसवणूक, लष्कराची हेरगिरी केल्याचा आरोप आहे,
6 / 10
अदनान यांना १०७५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान अदनान यांच्याबद्दलच्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
7 / 10
आपल्या जवळपास १ हजार प्रेयसी असल्याची माहिती अदनान यांनी डिसेंबरमध्ये सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींना दिली.
8 / 10
महिलांबद्दल माझ्या मनात अतिशय प्रेम आहे. प्रेम हीच माणसाची खासियत आहे. हे एका मुस्लिम व्यक्तीचं वैशिष्ट्य आहे, असं अदनान म्हणाले.
9 / 10
अदनान यांनी माझ्यासह अनेक महिलांसोबत शरीर संबंध ठेवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेनं सुनावणीवेळी केला.
10 / 10
अदनान यांनी अनेक महिलांवर बलात्कार केला. त्यानंतर जबरदस्तीनं गर्भनिरोधक गोळ्या खायला लावल्या, असा खळबळजनक दावा महिलेनं केला. त्यानंतर अदनान यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी तिथे ६९ हजार गर्भनिरोधक गोळ्या सापडल्या.