शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'तालिबान राज' मधील पहिले फोटो; कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये लावण्यात आला 'पडदा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 5:15 PM

1 / 6
तालिबाननं अफगाणिस्तानवर पुन्हा नियंत्रण मिळवलं. त्यानंतर तालिबानी हायर एज्युकेशन मिनिस्ट्रीनं एक आदेश जारी केला होता. तसंच यामध्ये महाविद्यालयात मुलं आणि मुलींचे वर्ग वेगळे असावे असं सांगण्यात आलं होतं. जर हे शक्य नसेल तर दोघांच्या मध्ये पडदे असावे असं म्हटलं होतं. तालिबानच्या या आदेशानंतर अफगाणिस्तानातील एका कॉलेजचे फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो - ट्विटर)
2 / 6
अफगाणिस्तानातील वृत्तसंस्था आमज न्यूजच्या सोशल मीडिया हँडलवर अफगाणिस्तानातील एका कॉलेजमधील काही फोटो व्हायरल झाले आहे. यामध्ये कॉलेमध्ये लेक्चर सुरू असल्याचं दिसत आहे. तसंच मुलं आणि मुलींमध्ये पडदाही असल्याचं दिसून येत आहे. (फोटो - ट्विटर)
3 / 6
तालिबाननं आपल्या आदेशात हेदेखील म्हटलं होतं की विद्यापीठांना आपल्या सोयीनुसार विद्यार्थिनींसाठी महिला शिक्षकांची भरती करण्याची गरज आहे. असं न झाल्यास उत्तम वर्तणूक असलेले शिक्षक किंवा वृद्ध पुरूष शिक्षक त्यांना शिकवू शकतात. या फोटोंमध्ये एक प्राचार्य विद्यार्थ्यांना शिकवतानाही दिसत आहेत. (फोटो - ट्विटर)
4 / 6
दरम्यान, तालिबानच्या आदेशात असंही सांगण्यात आलं होतं की महाविद्यालये, विद्यापीठ अशा ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी निराळी एन्ट्री आणि एक्सिट असली पाहिजे. तर विद्यार्थिनींनी मुलांच्या पाच मिनिटं आधीचं आपलं कामकाज संपवलं पाहिजे, जेणेकरून त्यांनी पुरुषांशीं संवाद साधू नये. तसंच जोवर विद्यार्थी बाहेर पडत नाहीत, तोवर विद्यार्थिनींनी वेटिंग रूममध्येच थांबावं असंही म्हटलं होतं. (फोटो - ट्विटर)
5 / 6
यापूर्वी तालिबानच्या कार्यकाळात महिलांच्या शिक्षणावर आणि नोकरी करण्यावर निर्बंध घालण्यात आले होतं. तसंच सध्या मुलींना शिक्षण घेण्यास शाळा कॉलेजांमध्ये जाऊ दिलं जात आहे हा एक सकारात्मक बदल असल्याचं एका शिक्षकानं सांगितलं.
6 / 6
१९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तावर तालिबानचा कब्जा होता. त्यावेळी महिलांचे अधिकार आणि स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आलं होतं. म्हणूनच आता पुन्हा तालिबाननं मिळवलेल्या ताब्यानंतर त्यांच्यात भीतीचं वातावरण होतं. परंतु आता तालिबाननं आपण महिलांच्या अधिकारांचं संरक्षण करणार असल्याचं म्हटलं आहे. तरीही त्या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे.
टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानSchoolशाळाcollegeमहाविद्यालय