Afghanistan Crisis: Former Afghan ministers face pizza delivery, German photos go viral
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या माजी मंत्र्यांवर आली पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ, जर्मनीतील फोटो झाले व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 10:15 AM1 / 8अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्ज्यानंतर राष्ट्रपती अश्रफ घानी यांच्यासह अनेक नेते देश सोडून गेले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानच्या एका मंत्र्यांचे जर्मनीमधील फोटो समोर आले आहेत. त्या फोटोंनी लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. 2 / 8अफगाणिस्तान सरकारमध्ये संचार मंत्री असलेले सय्यद अहमद शाह सादत यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येताच देश सोडला होता. आता समोर येत असलेल्या वृत्तानुसार ते जर्मनीमध्ये आश्रयाला गेले आहेत. 3 / 8दरम्यान, EHA News ने काही फोटो ट्विट केले आहेत. या फोटोंनुसार अफगाणिस्तानचे माजी मंत्री अहमद शाह जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करण्याचे काम करताना दिसत आहेत. अहमद हे तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला तेव्हा ते मंत्री नव्हते. तर त्यांना वर्षभरापूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता. 4 / 8आता अफगाणिस्तानचे माजी मंत्री असलेले सय्यद अहमद शाह हे जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनले आहेत. ते जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करून उदरनिर्वाह करत आहेत. 5 / 8व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये त्यांना जर्मनीतील लीपजिगमध्ये सायकलवरून पिझ्झा डिलिव्हरी करताना दाखवण्यात आले आहे. अहमद शाह यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र याबाबत माजी मंत्र्यांकडून कुठलेही वक्तव्य समोर आलेले नाही. 6 / 8तालिबानने ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये अंधाधुंदी माजली आहे. अनेकजण देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर धाव घेत आहे. राष्ट्रपती अश्रफ घानी हेसुद्धा काबुल सोडून संयुक्त अरब अमिरातीमध्ये आश्रयाला गेले आहेत. 7 / 8दरम्यान, मी देश सोडून गेलो नसतो तर देशात नरसंहार झाला असता. रक्ताचे पाट वाहिले असते. मी देशामध्ये असे होताना पाहू शकत नव्हतो. त्यामुळे मला माघार घ्यावी लागली. दरम्यान, अश्रफ घनी यांनी पैसे घेऊन पळाल्याचे वृत्त फेटाळले आहे. 8 / 8तर काबुल विमानतळावर अजूनही लोकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ब्रिटन, भारतासह अनेक देश आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications