शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Afghanistan Crisis: हृदयद्रावक! रक्ताचा चिखल, हाडामासाचा सडा; काबुलच्या विमानतळावरील फोटो पाहून हेलावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 2:03 PM

1 / 10
तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून परिस्थिती बिघडत चालली आहे. दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. अनेक जण देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.
2 / 10
अमेरिकेचं सैन्य मायदेशी परतताच अफगाणिस्तान तालिबाननं डोकं वर काढलं. त्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती चिघळत गेली. तालिबाननं एका पाठोपाठ एक प्रांत काबीज करत राजधानी काबुलवरही ताबा मिळवला.
3 / 10
तालिबानमुळे देशातील लाखो लोकांना असुरक्षित वाटू लागलं आहे. तालिबानच्या हातून मरण येऊ नये म्हणून लोक जीव धोक्यात घालून देश सोडून जात आहेत. देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात अनेक नागरिकांचा जीव गेला आहे.
4 / 10
काबुलच्या विमानतळावरून उड्डाण करत असलेल्या अमेरिकेच्या हवाई दलाच्या विमानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अमेरिकन हवाई दलाच्या विमानानं टेक ऑफ केल्यानंतर धावपट्टीवर काय परिस्थिती होती, हे दाखवणारे फोटो आता समोर आले आहेत.
5 / 10
काबूल विमानतळावरून निघणारं विमान पकडण्यासाठी धावपट्टीवरून शेकडो लोक धावले. यातले काही जण विमानाला लटकले. विमानानं उड्डाण करताच लटकलेले लोक खाली कोसळले आणि मृत्यूमुखी पडले.
6 / 10
काबुल विमानतळावर घडलेल्या घटनेचा तपास अमेरिकन हवाई दलाकडून करण्यात आला. यामध्ये सी-१७ विमानाच्या चाकांवर मानवी शरीराचे तुकडे आढळून आले.
7 / 10
अमेरिकन हवाई दलानं सी-१७ विमान काबुलच्या विमानतळावर उतरवलं. त्यावेळी तिथे शेकडो अफगाण नागरिक होते. विमानाचं दार उघडताच नागरिकांचा लोंढा विमानात शिरला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं वैमानिकानं टेक ऑफचा निर्णय घेतला.
8 / 10
विमानात शिरण्याची संधी न मिळालेल्या काहीजणांनी विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला. यातील काही जण विमानाच्या चाकात अडकले. काही जणांचा चाकाखाली येऊन मृत्यू झाला. त्याचे फोटो आता समोर आले आहेत.
9 / 10
काही जण विमानाला लटकण्यात यशस्वी ठरले. मात्र विमान आकाशात झेपावताच त्यांची पकड सुटली आणि ते खाली कोसळले. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
10 / 10
अमेरिकेच्या विमानाला लटकण्याचा प्रयत्न केलेले काही जण त्याच विमानाखाली आले. त्यांच्या रक्ताचा चिखल धावपट्टीवर पसरला. हाडामासाचा सडा पडला. ही दृश्यं अंगावर काटा आणणारी आहेत.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानAmericaअमेरिका