Afghanistan Crisis: The Seven Horse Mistakes That Failed US Missions in Afghanistan
Afghanistan Crisis: त्या सात घोडचुका, ज्यामुळे अमेरिकेचे मिशन अफगाणिस्तान फसले, २० वर्षांनंतर तालिबानी पुन्हा सत्तेत आले By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 4:06 PM1 / 9जवळपास २० वर्षे चाललेल्या संघर्षानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेतली आहे. अमेरिकन सैन्य माघारीच्या अंतिम टप्प्यात येताच तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळे अमेरिकेची अफगाणिस्तानमधील मोहीम फसल्याचे मानण्यात येत आहे. 2 / 9अमेरिकेची अफगाणिस्तान मोहीम अपयशी ठरण्यामागची अनेक कारणे सांगण्यात येत आहेत. स्पेशल इन्स्पेक्टर जनरल फॉर अफगाणिस्तान रिकंस्ट्रक्शनने (सिगार) आपल्या अहवालामधून यासंदर्भात सांगितलेली प्रमुख सात कारणे पुढीलप्रमाणे.3 / 9सिगारच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाकडे अफगाणिस्तानबाबत कुठलीही स्पष्ट रणनीती नव्हती. तालिबानचा खात्मा आणि देशाच्या पुनर्विकासाबाबत कुठली स्पष्टता अखेरपर्यंत आली नाही. 4 / 9 सिगारमधील अहवालानुसार अमेरिका अफगाणिस्तानची संस्कृती आणि राजकारणाचे आकलन करण्यात कमी पडली. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या. अमेरिकेने अशी न्यायव्यवस्था स्थापित करण्याचा प्रयत्न केला ज्याची अफगाण लोकांना सवय नव्हती. तसेच त्यांनी कुठल्याही एका पक्षाची बाजू घेत स्थानिक विवाद अधिकाधिक जटील बनवले. 5 / 9अमेरिकेने अफगाणिस्तानबाबत घेतलेल्या अनेक निर्णयांमध्ये दूरदृष्टीचा अभाव दिसून आला, असे सिगारच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले. यशस्वी ठरण्यासाठी किती वेळ लागेल, किती धन लागेल आणि किती लोक लागतील याचे काहीही नियोजन नव्हते. त्यामुळे ही मोहीम २० वर्षांच्या दीर्घ प्रयत्नाऐवजी एक एक वर्षाच्या २० प्रयत्नांमध्ये बदलली. 6 / 9सिगारच्या रिपोर्टनुसार अमेरिकेच्या खूप योजना अफगाणिस्तानमध्ये सुरू झाल्या. मात्र त्या पूर्णत्वाकडे जाऊ शकल्या नाहीत. रस्ते, रुग्णालये, विजघर आदींचे बांधकाम करण्यासाठी विकास योजना सुरू झाल्या. मात्र त्यांची देखभाल करण्यासाठी कुणीही उत्तरदायी नव्हते. त्यामुळे ते अपूर्ण राहिले किंवा वाया गेले. 7 / 9सिगारच्या रिपोर्टनुसार अमेरिकी लष्कर आणि त्यांना मदत करणाऱ्या संस्थांकडे कुशल लोकांचा अभाव होता. त्याचं कारण म्हणजे एका वर्षानंतर पथके बदलत असत. त्यामुळे नव्या लोकांकडे पुरेसा अनुभव नसे. त्यामुळे प्रशिक्षणामध्ये कमतरता राहून गेली. 8 / 9अफगाणिस्तानमधील लोक मोठ्या प्रमाणावर हिंसाचारामुळे त्रस्त होते. तसेच भीतीच्या छायेखाली होते. ही बाब आर्थिक विकासात मोठा अडथळा होती. अफगाणी सेनेला तैनातीसाठी कमी वेळ मिळाला. त्यांची तैनाती घाईगडबडीत झाली. 9 / 9सिगारचा रिपोर्ट म्हणतो की, अमेरिकी सरकारने योजनांच्या समीक्षेवर पुरेसा वेळ घालवला नाही. तसेच चुकांमधून धडाही शिकला नाही. त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती केली गेली. आणखी वाचा Subscribe to Notifications