Afghanistan crisis US military dogs evacuated from kabul airport after taliban enter in kabul
Afghanistan crisis : अफगाण नागरिक विमानाला लटकून पडले, अमेरिकन कुत्र्यांनाही मिळाली विमानात जागा! By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 9:40 PM1 / 7तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर, अफगाण नागरिक कुठल्याही स्थितीत अफगाणिस्तानातून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. एवढेच नाही, तर हे लोक काबूल विमानतळावर अमेरिकन विमानांना लटकून पळून जाण्याचा प्रयत्न करतानाही दिसले. यात काहींचा जीवही गेला. अशा भयावह परिस्थितीत, अफगाणी नागरिक विमानाला लटकून पडत असताना, अमेरिकन सैन्याच्या कुत्र्यांना मात्र विमानात जागा मिळत आहे. (Afghanistan crisis US military dogs evacuated from kabul airport after taliban enter in kabul)2 / 7खरे तर, तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतल्यापासून तेथील परिस्थिती आणखीनच चिंताजनक बनली आहे. अमेरिकेसह अनेक देशांचे लोक काबूलमधून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढत आहेत.3 / 7अमेरिकेने आपल्या नागरिकांना काबूलमधून बाहेर काढण्यासाठी एक विमान आणले आहे. अमेरिका आपल्या नागरिकांसह, सैनिक आणि त्यांच्या कुत्र्यांनाही अफगाणिस्तानातून बाहेर काढत आहे.4 / 7द मिररने दिलेल्या वृत्तानुसार, लष्कराच्या प्रशिक्षित कुत्र्यांना काबूल विमानतळावर आणण्यात आले आणि त्यांना विमानात चढवण्यात आले. विशेष म्हणजे, हजारो अफगाण लोक देश सोडण्यासाठी विमानतळावर संघर्ष करत असताना हा प्रकार दिसून आल्याचे बोलले जात आहे.5 / 7कालच काबुलमधून उड्डाण केलेल्या एका विमानातून काही लोक पडल्याचा एक व्हिडिओ माध्यमांतून व्हायरल होत होता. या घटनेत तीन जणांचा मृत्यूही झाला. यानंतर विमानातील एक फोटोही समोर आला. या विमानात क्षमतेपेक्षाही अधिक लोक भरण्यात आलेले होते. हे अमेरिकन हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर विमान होते.6 / 7एवढेच नाही, तर हे विमान काबूल विमानतळावरून उड्डाण करत असताना शेकडो लोक त्याच्या भोवती पळत होते. यातील काही लोक विमानाला लटकून प्रवास करण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नात काही लोक जखमीही झाले.7 / 7अफगाणिस्तानात अशी भयावह स्थिती असताना, लोकांना येथून पळून जाण्यासाठी विमानात जागा मिळत नसताना, अमेरिका आपल्या सैन्याचे प्रशिक्षित कुत्रे विमानातून नेत आहे. ते अफगाणिस्तानातून आपल्या सैनिकांना आणि नागरिकांनाही सुरक्षितरित्या बाहेर काढत आहे. इतर देशही आपल्या लोकांना वाचवत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications