शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Afghanistan Crisis: ...अन् अफगाणिस्तानचं संपूर्ण हवाई दल झालं गायब; २०० विमानं दिसेनाशी झाल्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 12:27 PM

1 / 12
तालिबाननं अफगाणिस्तानवर कज्बा करून आठवडा उलटला आहे. या कालावधीत अफगाणिस्तानमधील भीषण परिस्थिती जगासमोर आली. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी अवघ्या काही दिवसांत तालिबानसमोर शरणागती पत्करली.
2 / 12
तालिबानचे दहशतवादी एकापाठोपाठ एक प्रांत काबीज करत असताना अफगाणिस्तान सरकारनं हवाई दलाचा वापर का केला नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. काबुलमध्ये अफगाणी हवाई दलाचं मुख्यालय आहे. मात्र तालिबानी काबुलकडे कूच करत असताना हवाई दलानं हल्ला का केला नाही, हा प्रश्न कायम आहे.
3 / 12
अफगाणिस्तान हवाई दलाकडे २४२ विमानं होती. यामध्ये लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स, मालवाहू विमानांचा समावेश होता. हवाई दलात जवळपास ७ हजार कर्मचारी होते. मात्र तालिबाननं काबुलवर कब्जा केला, तेव्हा हवाई दल रिकामं झालं होतं.
4 / 12
तालिबानी दहशतवादी काबुलमध्ये पोहोचण्यापूर्वीच हवाई दलाच्या जवानांनी विमानं आणि हेलिकॉप्टर्ससह शेजारी देशांच्या दिशेनं उड्डाण केलं. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केला, त्यावेळी संपूर्ण हवाई दल गायब झालं होतं.
5 / 12
सध्याच्या घडीला हवाई दलाचं मुख्यालय असलेल्या काबुलमध्ये आणि इतर हवाई तळांवर ४० ते ५० विमानं आणि हेलिकॉप्टर्स उभी आहेत. मात्र त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे.
6 / 12
ब्राझीलमध्ये तयार झालेली ए-२९ सुपर टुकानो लाइट फायटर्स विमानं अफगाणी हवाई दलाकडे होती. मर्यादित स्वरुपाच्या मोहिमांमध्ये ही विमानं प्रभावी ठरतात. शत्रूवर अचूक निशाणा लगावण्याची क्षमता या विमानांमध्ये आहे. मात्र तालिबानी काबुलकडे कूच करत असताना हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही विमानं घेऊन पळ काढला.
7 / 12
अफगाणिस्तानकडे एमआय-८ हेलिकॉप्टर्सदेखील होती. सामानांची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी ही हेलिकॉप्टर्स जगातील ४० देश वापरतात. मात्र अफगाणिसतानच्या हवाई दलाकडे असलेली हेलिकॉप्टर्स बरीच जुनी होती.
8 / 12
अमेरिकेत तयार झालेली यूएच-६० ब्लॅकहॉक्स हेलिकॉप्टर्स कधीकाळी अतिशय प्रभावी मानली जायची. मात्र अफगाणिस्तानकडे असलेली ही हेलिकॉप्टर्स फारशी प्रभावी नाहीत. सध्या चांगल्या स्थितीत असलेल्या एक-दोन हेलिकॉप्टरवर आता तालिबानचा कब्जा आहे.
9 / 12
अफगाणिस्तानला काही विमानं सोव्हिएत रशियाकडून मिळाली. तर काही विमानं आणि हेलिकॉप्टर्स त्यांना अमेरिका आणि नाटोच्या सैन्यानं दिली. यामध्ये हल्ला करण्याची क्षमता असलेल्या विमानांसह मालवाहू विमानं आणि हेलिकॉप्टर्सचादेखील समावेश होता.
10 / 12
अफगाणच्या हवाई दलाकडे २०० हेलिकॉप्टर्स, ४७ विमानं आणि २९ लढाऊ विमानं होती. अफगाणिस्तानात तब्बल १० हवाई तळ आहेत. त्यामुळेच हवाई दलानं तालिबान्यांवर हल्ला का केला नाही, हा प्रश्न अनेकांना पडला. ही सगळी विमानं, हेलिकॉप्टर्स सध्या आहेत कुठे हा प्रश्नदेखील अनेक जण विचारत आहेत.
11 / 12
तालिबाननं काबुलवर ताबा मिळवण्यासाठी हालचाल सुरू करताच अफगाणिस्तानच्या हवाई दलाचे कर्मचारी विमानं, हेलिकॉप्टर्स घेऊन पसार झाले. त्यांनी शेजारच्या देशात आश्रय घेतला. एकट्या उझबेकिस्तानात अफगाणिस्तानची ४६ विमानं आणि हेलिकॉप्टर्स आहेत.
12 / 12
ताजिकिस्तान आणि अन्य शेजारी देशांच्या हवाई तळांवरही अफगाणी हवाई दलाची विमानं आणि हेलिकॉप्टर्स उभी आहेत. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनीदेखील एक मोठं हेलिकॉप्टर घेऊन संयुक्त अरब अमिरातला पळून गेले आहेत.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान