Afghanistan Crisis: Will the Taliban be the kings of a poor country?
Afghanistan Crisis : तालिबानी ठरणार कंगाल देशाचे राजे? By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 10:38 AM1 / 9अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तानातून गाशा गुंडाळण्याचे ठरवताच शिरजोर झालेल्या तालिबानने अवघ्या काही दिवसांतच अफगाणिस्तानचा ताबा मिळवला. 2 / 9आता त्यांची अफगाणिस्तानात अनिर्बंध सत्ता राहील. ती किती दिवस, महिने आणि वर्षं टिकेल, हे आताच सांगता येणे अशक्य आहे. मात्र, तूर्तास तरी अफगाणिस्तानची तिजोरी खंक असल्याने तालिबान ओसाडगावचे पाटील ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. 3 / 9द अफगाणिस्तान बँकेकडे एकूण १० अब्ज डॉलरची संपत्ती आहे. या संपत्तीत १.३ अब्ज डॉलर म्हणजेच साडेनऊ हजार कोटी रुपये मूल्याच्या सोन्याचा समावेश आहे. ३६ कोटी डॉलर मूल्याची परकीय गंगाजळीही मध्यवर्ती बँकेकडे जमा आहे. 4 / 9बँकेकडे सोन्याच्या विटाही आहेत. मात्र, हा सर्व ऐवज बँकेने देशाच्या बाहेर सुरक्षित ठेवला आहे. इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट (आयबीआरडी) यांच्या माध्यमातून अफगाणिस्तानी बँकेने ही तजवीज केली आहे. 5 / 9प्राचीन मूर्ती, कलाकृती तालिबानींच्या हाती पडू नये यासाठीही बँकेने प्रयत्न केले असून त्यांचीही सुरक्षित स्थळी रवानगी केली आहे. त्यामुळे तालिबानींकडे सरकार चालवण्यासाठी पैसाच नसेल.6 / 9७४ हजार कोटी रुपयांची रोकड अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेने (द अफगाणिस्तान बँक) दडवून ठेवली आहे. तालिबानचे संकट ओळखून बँकेने आधीच ही रक्कम व इतर संपत्ती देशाबाहेर नेऊन ठेवली आहे.7 / 9अमेरिकेतीही काही संपत्ती दडवून ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत देशाचा कारभार हाकणे तालिबानींना जड जाऊ शकते. 8 / 9ही सर्व परिस्थिती पाहता तालिबानींच्या हाती अफगाणिस्तानची सत्ता आली असली तरी त्यात काही राम नाही. तालिबानींचा भर लुटालुटीवर अधिक असेल. 9 / 9तसेच अफूच्या व्यवहारांवर अधिकाधिक जाचक कर लावले जातील. तालिबान आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करून मध्यवर्ती बँकेची संपत्ती देशाकडे परत देण्यास सांगतील, असा तज्ज्ञांचा होरा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications