शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राफेलनंतर शक्तीशाली, सशस्त्र ड्रोन मिळणार; अमेरिका 450 किलोंचे बॉम्बही देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 3:23 PM

1 / 10
चीनसोबत चाललेल्या तणावामध्ये अमेरिका आणि भारत शस्त्रास्त्र ताकद वाढविण्याच्या तयारीत आहेत. अमेरिका भारताला अद्ययावर शस्त्रे देणार असून यामध्ये सशस्त्र ड्रोनही असणार आहे. हा ड्रोन एकावेळी 1000 पौंड म्हणजेच 450 किलोपेक्षा जास्त बॉम्ब आणि मिसाईल नेण्यास सक्षम असणार आहे.
2 / 10
चीनच्या सैन्याने लडाखमध्ये घुसखोरी करून गलवान खोऱ्यामध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला होता. तेव्हापासून भारताने चीनविरोधात पाऊल उचलले असून अनेक वस्तू, अॅप बॅन केली आहेत. यामुळे चीन आणखी भडकला आहे.
3 / 10
त्यातच लडाखमध्ये नामुष्की पहावी लागली आहे. यामुळे चिनी सैन्य़ आता हळूहळू मागे सरकू लागले आहे. या साऱ्या घडामोडींवर अमेरिकेचे भारताला सशस्त्र ड्रोन देण्याची योजना महत्वाची मानली जात आहे. मिडीया रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आले आहे
4 / 10
अमेरिकेच्या फॉरेन पॉलिसी नियतकालिकाने अमेरिकी अधिकारी आणि संसदेच्या काही सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार भारत आणि चीनच्या हिंसक झटापटीवरून भारताला शस्त्रास्त्रे विक्री वाढविण्याचा विचार करत आहे. यामुळे वॉशिंग्टन आणि बिजिंगदरम्यान आणखी एक वादाचा मुद्दा बनणार आहे.
5 / 10
या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने यामध्ये म्हटले आहे की, अमेरिकेने नुकतीच भारताला शस्त्रे देण्याची नवीन योजना बनविली आहे. यामध्ये सशस्त्र ड्रोनसारखे अतिअद्ययावत शस्त्रास्त्रे आणि अद्ययावत यंत्रणेचा समावेश आहे.
6 / 10
यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकेचे नियम बदलले आहेत. अमेरिकेमध्ये भारतासारख्या परदेशी भागिदारांना ड्रोन सारखी शस्त्रास्त्रे विकण्यास बंदी होती. हा कायदाच ट्रम्प यांनी बदलला आहे.
7 / 10
या बदलामुळे अमेरिकेला सशस्त्र ड्रोन विक्रीवर विचार करण्याची परवानगी मिळणार आहे. ड्रोनचा वेग आणि शस्त्र नेण्याच्या क्षमतेमुळे बंदी आणण्यात आली होती.
8 / 10
या प्रकरणाशी संबंधित एका सिनेट सदस्याने सांगितले की, आम्ही भारताला सशस्त्र श्रेणी 1 ची शस्त्रे देणार आहोत. यामध्ये ‘एमक्यू-1 प्रीडेटर ड्रोन’ जे 1000 पौंडहून अधिक वजनाचे बॉम्ब व मिसाईल नेण्यास सक्षम असणार आहेत.
9 / 10
अमेरिकेने याआधी लष्करी सामुग्री वाहून नेण्यासाठी ताकदवान हेलिकॉप्टरही दिले आहेत. हे हेलिकॉप्टर एवढे शक्तीशाली आहेत की रणगाडे, तोफाही उचलून नेऊ शकतात.
10 / 10
त्यातच काही दिवसापूर्वी भारताला पाच राफेल विमाने मिळाली आहेत. यामुळे भारतीय हवाईदलाची तकद कमालीची वाढली आहे.
टॅग्स :Americaअमेरिकाindian air forceभारतीय हवाई दलchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव