Covaxin घेतलेल्यांना आता अमेरिकेत सहज मिळणार एन्ट्री; WHO च्या निर्णयानंतर US नं अपडेट केली यादी By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 4:57 PM
1 / 9 भारत बायोटेकची (Bharat Biotech) स्वदेशी कोरोना प्रतिबंधात्मक लस कोव्हॅक्सिन (Covaxin) घेतलेल्यांसाठी बुधवारी एक आनंदाची बातमी समोर आली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समूहानं भारताची कोरोना प्रतिबंधात्मक लस कोव्हॅक्सिनला इमरजन्सी यूझ लिस्टिंगसाठी (Emergency Use Listing, EUL) मंजुरी दिली. 2 / 9 भारत बायोटेकनं इमरजन्सी यूझ लिस्टिंगसाठी १९ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज केला होता. यापूर्वी कमिटीने दोनदा कोव्हॅक्सिन उत्पादित करणाऱ्या कंपनीकडून स्पष्टीकरण मागवलं होतं. दरम्यान, आता मंजुरीनंतर परदेशवारी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 3 / 9 कोरोना प्रतिबंधात्मक स्वदेशी Covaxin लस घेतलेल्यांना आता अमेरिकेत प्रवास करता येणार आहे. याबाबत अमेरिकेच्या प्रशासनानं हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे आता कोव्हॅक्सिन घेतलेल्या प्रवाशांसाठी अमेरिका वारी करणं शक्य होणार आहे. 4 / 9 सीडीसीचा ट्रॅव्हल गाईडन्स एफडीएद्वारे स्वीकृत किंवा अधिकृत आणि जागतिक आरोग्य संघटनेद्वारे इमरजन्सी यूज लिस्टमध्ये सामील केलेल्या लसींवर लागू होतं. यामध्ये कोणत्याही नव्या लसीचा समावेश केला तर तो काही वेळानं गाईडन्समध्ये जोडला जातो, अशी माहिती सीडीसीचे प्रेस अधिकारी स्कॉट पॉली यांनी दिली. ८ नोव्हेंबरपासून कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्यांना अमेरिकेत प्रवेश दिला जाणार आहे. 5 / 9 मागील आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीने भारतातील स्वदेशी लस कोव्हॅक्सिन (Covaxin)ला आपत्कालीन वापरासाठी यादीत टाकण्यासाठी अतिरिक्त माहिती मागवली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. 6 / 9 आधीच्या बैठकीबाबत, WHO ने म्हटलं होतं की, लसीचा जागतिक वापर लक्षात घेता अंतिम लाभ-जोखीम मूल्यांकनासाठी निर्मात्याकडून अतिरिक्त स्पष्टीकरण मागवलं जाणं आवश्यक आहं असं 'तांत्रिक सल्लागार गटाने बैठकीत निर्णय घेतला. ग्लोबल हेल्थ एजन्सीनं आधीच स्पष्ट केलं आहे की ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे याची खात्री करण्यासाठी तिचे पूर्ण मूल्यांकन करणे आवश्यक आहे. 7 / 9 सीडीएससीओनं उत्पादनाच्या तारखेपासून १२ महिन्यांपर्यंत कोव्हॅक्सिनचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती भारत बायोटेकनं यापूर्वी ट्विटरद्वारे दिली होती. वापरासाठी मिळालेली ही मंजुरी स्थायी आकड्यांच्या उपलब्धतेवर आधारित आहे, जो सीडीएससीओकडे सादर करण्यात आला होता असंही भारत बायोटेककडून सांगण्यात आलं. 8 / 9 WHO ने आतापर्यंत ६ लसींना मान्यता दिली आहे. यामध्ये फायझर, बायोएनटेक (Pfizer/BioNtech) कोमिरनेटी, एस्ट्राजेनेका कोविशील्ड (AstraZeneca's Covishield) जॉन्सन अँन्ड जॉन्सन (Johnson & Johnson's Vaccine), मॉडर्ना (Moderna) सिनोफार्म( Sinopharm)या लसींचा समावेश आहे. 9 / 9 तथापि, असे अनेक देश आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्यासाठी आणि प्रवाशांना त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. या देशांमध्ये गयाना, इराण, मॉरिशस, मेक्सिको, नेपाळ, पॅराग्वे, फिलीपिन्स, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया, ओमान, श्रीलंका, एस्टोनिया आणि ग्रीस यांचा समावेश आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची कोविशील्ड या भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्या दोन लसी आहेत. ऑस्ट्रेलियाने आधीच कोविशील्डला मान्यता दिली आहे. आणखी वाचा