शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Agneepath Scheme: देशाेदेशींचे ‘अग्निवीर’; जगातीलअनेक देशांत ‘अग्निपथ’सारखी पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 7:35 PM

1 / 10
भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीरांची भरती करण्यात येणार आहे. १७ ते २३ वयाेगटातील तरुणांना चार वर्षांसाठी अग्निवीर होऊन देशाची सेवा करता येणार आहे. मात्र, त्यानंतर काय, हा प्रश्न भारतीय सैन्यात सामील होण्याची स्वप्न पाहणऱ्या तरुणांना भेडसावत आहे.
2 / 10
अग्निवीरांना सामावून घेण्यासाठी तिन्ही सैन्यदलांसह काही मंत्रालयांनीही योजना आखण्यास सुरुवात केली. तरुणांना अशा पद्धतीने चार वर्षांच्या अल्पकालीन सेवेसाठी लष्करात सामील करून घेणारा भारत हा एकमेव देश नाही. आजूबाजूची परिस्थिती पाहून काही देशांनी या पद्धतीने तरुणांना लष्करात संधी दिली आहे.
3 / 10
सैन्यदलाच्या संख्येचा विचार केल्यास चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. केंद्र सरकारने संसदेत १५ मार्च २०२१ रोजी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही सैन्यदलांत एकूण १३ लाख ४० हजार ९५३ जवान व अधिकारी आहेत
4 / 10
अमेरिका - - अमेरिकेत चार वर्षांसाठी सैनिक भरती होतात. गरज भासल्यास त्यांना मुदतवाढ देण्यात येते. - या सैनिकांना ३५ हजार डॉलर्स एवढा क्विकशिप बोनस देण्यात येतो. - या सैनिकांना पूर्णकालीन सेवेसाठीही अर्ज करता येतो. - त्यानंतर २० वर्षांच्या सेवेनंतर पेन्शन मिळते. - लवकर निवृत्ती घेतल्यास त्यांना भत्ता देण्यात येतो.
5 / 10
चीन - - चीनमध्ये दरवर्षी सुमारे ४.५ लाख सैनिकांची भरती - या सैनिकांना ४० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. - त्यानंतर ते दोन वर्षांसाठी सैन्यात सेवा देतात. - हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पात्र सैनिकांना पूर्णकालीन सेवेत सामावून घेण्यात येते. - निवड न झालेल्या सैनिकांना करसवलती व कर्ज सुविधा मिळते
6 / 10
इस्रायल - - पॅलेस्टीनसोबत कायम संघर्षात असलेल्या इस्रायलमध्ये तरुणांना लष्करी सेवा बंधनकारक आहे. - तरुणांना प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येते. - पुरुषांना ३२ महिने आणि महिलांना २४ महिने सेवा देणे आवश्यक आहे. - हा कालावधी पूर्ण करणाऱ्यांना राखीव यादीत ठेवण्यात येते. त्यापैकी १० टक्के तरुणांची सैन्यात भरती. - १२ वर्षांची सेवा दिल्यानंतर सैनिकांना पेन्शनही मिळते.
7 / 10
दक्षिण कोरिया - - तरुणांना लष्करात २१, नौदलात २३ आणि हवाई दलात २४ महिन्यांची सेवा बंधनकारक आहे. - शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सर्वांना सक्ती आहे. - ऑलिम्पिक किंवा आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्यांना सवलत व इतर सुविधा मिळतात. - जे पदक जिंकू शकत नाही, त्यांना पुन्हा सैन्यात भरती व्हावे लागते.
8 / 10
रशिया - - रशियामध्ये सैन्य भरतीसाठी हायब्रिड मॉडेल आहे. - १८ ते २७ वर्षे वयाच्या तरुणांना एक वर्ष कठोर प्रशिक्षणानंतर सैन्यात भरतीची संधी मिळते. - प्रशिक्षणानंतर त्यांना राखीव म्हणून ठेवण्यात येते. निवड झालेल्या सैनिकांना आठ महिन्यांचे आणखी प्रशिक्षण देण्यात येते. - या सैनिकांमधून पुढे स्थायी भरती करण्यात येते. - शिक्षणासाठी या सैनिकांना विद्यापीठांमध्ये प्राधान्य देण्यात येते.
9 / 10
फ्रान्स - - फ्रान्समध्ये सैनिकांची कंत्राटी भरती होते. - सैनिक स्वेच्छेने भरती होऊ शकतात. - १ ते ५ वर्षांचे कंत्राट असतात. त्यांचे नूतनीकरण होते. - सैनिकांना तीन महिने प्रशिक्षण देण्यात येते. - १९ वर्षे सैन्यामध्ये सेवा देणाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो.
10 / 10
या देशांमध्ये सक्तीचे - उत्तर काेरिया, नाॅर्वे, स्वीडन, इरिट्रीया, ब्राझील, सायप्रस, बर्म्युडा, ग्रीस, इराण, मेक्सिकाे, सिंगापूर, स्वित्झर्लंड, थायलँड, तुर्की आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमध्येही नागरिकांना सैन्यदलांमध्ये सेवा देणे सक्तीचे आहे. अशा योजनेद्वारे तेथे लष्करभरती होते. नाॅर्वे आणि स्वीडन येथे काेणताही लिंगभेद करण्यात येत नाही.
टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवानrussiaरशियाAmericaअमेरिका