शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एअर हॉस्टेसना करावा लागतो या आव्हानांचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 3:45 PM

1 / 7
एअर हॉस्टेसचे नाव घेताच आपल्यासमोर सुंदर, ग्लॅमरस आणि हजरजबाबी चेहऱ्याच्या तरुणी उभ्या राहतात. पण एअर हॉस्टेसचे काम वाटते तितके सोपे नाही. त्यांना आपल्या दैनंदिन कामात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
2 / 7
एअर हॉस्टेसना आपले वजन नेहमी नियंत्रणात ठेवावे लागते. काही वर्षांपूर्वी वजन प्रमाणापेक्षा जास्त असल्याने एअर इंडियाने सुमारे 130 एअर हॉस्टेसना कामावरून कमी केले होते.
3 / 7
एअर हॉस्टेससाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. फिट नसल्यास आपातकालीन परिस्थितीत त्यांना आपले काम व्यवस्तितपणे करता येऊ शकणार नाही. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
4 / 7
विमान पत्तन प्राधिकरण एअसर हॉस्टेससाठी बॉडी मास इंडेक्स आणि अन्य फिटनेसचे मानदंड तयार करत असतात.
5 / 7
2010 मध्ये एअर इंडियाने 10 फ्लाइट अटेंडन्टना फिटनेसचे कारण देऊन फ्लाइट ड्युटीवरून हटवले होते.
6 / 7
स्वस्तात सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांमध्ये अन्य सुविधा नसल्या तरी केबिन क्रू हा असतोच. त्यावरून त्यांचे महत्त्व समजून येते.
7 / 7
लांब पल्ल्याच्या विमान सेवांमध्ये केबीन क्रूला खूप जास्त ड्युटी करावी लागते. कधी विमानात वैद्यकीय आणीबाणी निर्माण होते. त्यामुळे केबीन क्रू फिट असणे महत्वाचे असते.
टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळ