शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२५ मध्ये उड्डाण, २०२४ मध्ये जमिनीवर उतरलं विमान, कसा घडला हा टाइम ट्रॅव्हलचा चमत्कार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:03 IST

1 / 6
२०२४ हे वर्ष सरून २०२५ ला सिुरुवात झाली आहे. सरत्या वर्षाला जगभरातून वेगवेगळ्या पद्धतीने निरोप देण्यात आला आहे. दरम्यान, एका विमानाने २०२५ या वर्षाला सुरुवात झाल्यावरू उड्डाण करून ते विमान २०२४ हे वर्ष सुरू असताना जमिनीवर उतरलं, असं सांगितल्यास आपल्यापैकी कुणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण टाइम ट्रॅव्हलचे किस्से चित्रपट आणि मालिकांमधून पाहिले असले तरी प्रत्यक्षात असं घडणं सध्यातरी अशक्य असल्याची जाणीव सर्वांना आहे. मात्र अशी एक घटना समोर आली आहे. जी एखाद्या टाइम ट्रॅव्हलसारखी वाटू शकते. मात्र हा नेमका काय प्रकार आहे, हे आपण आता जाणून घेऊयात.
2 / 6
कॅथे पॅसिफिकच्या विमान सीएक्स८८० ने १ जानेवारी २०२५ रोजी हाँगकाँग येथून उड्डाण केलं आणि हे विमान ३१ डिसेंबर २०२४ रोजी अमेरिकेमधील लॉस एंजलिस येथे उतरलं. ऐकण्यास धक्कादायक वाटत असलं तरी हे खरं आहे. तसेच हा प्रकार इंटरनॅशनल डेटलाइनमुळे घडला.
3 / 6
इंटरनॅशनल डेटलाईन ही एक काल्पनिक रेषा आहे. ती पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी आहे. हाी रेषा पृथ्वीवरील दोन वेगवेगळ्या तारखांना विभाजित करते. जेव्हा विमान या रेषेला पार करते, तेव्हा तारीख बदलते. पश्चिमेकडे जाताना तारीख एक दिवस पुढे जाते. तर पूर्वेकडे येताना तारीख एक दिवस मागे जाते.
4 / 6
समजा तुम्ही १ जानेवारी रोजी सकाळी हाँगकाँग येथून विमान पकडलं आणि हे विमान इंटरनॅशनल डेटलाईन पार करून लॉस इंजेलिसला पोहोचलं तर तिथे तारीख ही ३१ डिसेंबर असेल. त्यामुळे वेळेच्या मागे गेल्यासारखं तुम्हाला वाटेल. हे सर्व इंटरनॅशनल डेटलाइनमुळे घडतं.
5 / 6
कॅथे पॅसिफिकच्या या विमानात बसलेल्या प्रवाशांसाठी हा प्रवास खूप खास ठरला. त्यांनी नव्या वर्षाचा जल्लोष आधी हाँगकाँगमध्ये साजरा केला. त्यानंतर लॉन एंजेलिस येथे पोहोचून त्यांनी पुन्हा नववर्षाचं स्वागत केलं. त्यांच्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव ठरला.
6 / 6
इंटरनॅशनल डेटलाइन जगभरात तारीख निश्चित करण्यास मदत करते. मात्र त्याला काही कायदेशीर दर्जा नाही आहे. ही रेषा सरळ नाही आहे. तर देश आणि भूगोलानुसार वळणदार आहे. उदाहरणच द्यायचं तर ती रशिया आणि अलास्कादरम्यान झिगझॅग करते. या अनोख्या प्रवासामध्ये प्रवासांना टाइम ट्रॅव्हल सारखा अनुभव दिला. तसेच ही घटना सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरली आहे.
टॅग्स :airplaneविमानNew Yearनववर्षInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके