शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Airplane footprint Lines: आकाशातून विमान गेल्यावर मागे पांढऱ्या रेषा का दिसतात? असं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 3:49 PM

1 / 6
उंच आकाशातून एखादे विमान गेल्यावर कधीकधी विमानाच्या मागे पांढऱ्या रेषा दिसू लागतात. या रेषा नेमक्या का दिसतात आणि त्या कशा तयार होतात हे बहुतांश लोकांना माहिती नसते. काही जण या रेषा म्हणजे विमानातून निघणारा धूर तर काही जण ही बर्फाची रेषा असते, असे सांगतात. मात्र या रेषा नेमक्या असतात तरी काय, हे आता जाणून घेऊया.
2 / 6
नासाच्या एका रिपोर्टनुसार आकाशात बनणाऱ्या या पांढऱ्या रेषांना कंट्रेल्स म्हणतात. कंट्रेल्स हे सुद्धा ढगच असतात. मात्र हे सर्वसामान्य ढगांप्रमाणे नसतात. हे कंट्रेल्स हे विमान किंवा रॉकेट गेल्यानंतरच तयार होतात. तसेच ते आकाशात खूप उंचावर तयार होता.
3 / 6
रिपोर्ट सांगतात की, अशा प्रकारे ढग त्या स्थितीत बनतात जेव्हा विमान जमिनीवरून सुमारे ८ किमी वर आणि उणे ४० डिग्री सेल्सियसमध्ये उडत असते. विमान किंवा रॉकेटच्या एक्झॉस्ट फॅनमधून एरोसॉल्स निघतात. जेव्हा आकाशातील आर्द्रता ही एरोसॉल्ससोबत गोठते तेव्हा कंट्रेल्स तयार होता.
4 / 6
मात्र हे कंट्रेल्स काही वेळातच गायब होतात. जेव्हा विमान जाते तेव्हा काही काळ हे कंट्रेल्स दिसतात त्यानंतर ते आकाशाच्या निळाईमध्ये लुप्त होतात. ते निर्माण होण्याचे कारण हे हवेतील आर्द्रता असते.
5 / 6
अनेकदा आकाशामध्ये एवढ्या उंचीवर वेगाने हवा वाहत असल्यान कंट्रेल्स आपल्या जागेवरून हलतात. त्यामुळे ते विमान जिथून गेलं आहे, अशा ठिकाणीची दिसतात असे नाही.
6 / 6
हे कंट्रेल्स सर्वप्रथम १९२० मध्ये दिसले होते. लांबूनच दिसत असल्याने लढाऊ विमानातील पायलट शत्रूच्या तावडीत येण्यापासून वाचत असत. मात्र या धुरामुळे काही दिसत नसल्याने अनेक विमाने एकमेकांवर आदळून अनेक अपघातही झाले होते.
टॅग्स :scienceविज्ञानairplaneविमानInternationalआंतरराष्ट्रीय