Aliens visited Earth in 2017 scientists ignored Harvard astronomer claimed
मोठा खुलासा! ४ वर्षांआधीच पृथ्वीवर पोहोचले होते एलिअन्स, हार्वर्डच्या मोठ्या वैज्ञानिकाचा दावा.... By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 12:59 PM1 / 11जगप्रसिद्ध हार्वर्ड यूनिव्हर्सिटीतील(Harvard university) एका प्रमुख वैज्ञानिकांनी दावा केला आहे की एलिअन्स २०१७ मध्येच पृथ्वीच्या(Earth) दौऱ्यावर आले होते. पण वैज्ञानिकांनी या घटनेकडे दुर्लक्ष केलं. 2 / 11प्रोफेसर एवि लोएब(Avi Loeb) यांनी त्यांच्या एका नव्या पुस्तकात हा दावा केला आहे. लोएब यांनी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्यासोबतही काम केलं आहे.3 / 11प्रोफेसर एवि लोएब यांच्या ज्या पुस्तकात एलिअनबाबत(Aliens) हा दावा करण्यात आला आहे त्या पुस्तकाचं नाव Extraterrestrial : The First Sign of Intelligent Life Beyond Earth असं आहे. 4 / 11५८ वर्षीय इस्त्रायली- अमेरिकन एस्ट्रोनॉमरने सांगितले की, ४ वर्षाआधी एक असामान्य आकाराची वस्तू दिसली होती. पण वैज्ञानिक समुदायांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. वैज्ञानिकांनी चुकीचा अर्थ काढला होता.5 / 11लोएब म्हणाले की, ही ऑक्टोबर २०१७ ची घटना आहे. एका फार वेगाने उडत असलेल्या वस्तूची माहिती मिळाली होती. या वस्तूचा स्पीड फार जास्त होता. 6 / 11असं वाटलं की, ही वस्तू दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीवर पोहोचली. मात्र, अनेक वैज्ञानिक प्रोफेसर एवि लोएब यांच्या या दाव्याशी सहमत नाहीत.7 / 11ऐस्ट्रोफिजिसिस्ट एथन सीगन यांनी फोर्ब्समध्ये लिहिले की, लोएब प्रतिष्ठित वैज्ञानिक होते. पण त्यांना त्यांच्या तर्कांवर सहकारी वैज्ञानिकांकडून सहमती मिळवू शकले नाहीत.8 / 11पण प्रोफेसर लोएब म्हणतात की, रूढीवादावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांना शिक्षा देण्याची परंपरा राहिली आहे. आणि ते याचा विरोध करतात.9 / 11ते म्हणाले की, गॅलिलिओने जेव्हा पहिल्यांदा प्रस्ताव दिला होता की, ब्रम्हांडाचं केंद्र पृथ्वी नाही. तेव्हा त्यांनाही शिक्षा देण्यात आली होती.10 / 11तेच काही वर्षांपूर्वी इस्त्राइलच्या स्पेस सिक्युरिटी एजन्सीचे माजी प्रमुख हॅम इशद यांनीही दावा केला होता की, एलिअन आहेत. इतकेच नाही तर इस्त्राइल आणि अमेरिका अनेक वर्षांपासून एलिअनच्या संपर्कात आहे. 11 / 11इशद यांनी असाही दावा केला होता की, एलिअन्सनीच त्यांना त्यांची माहिती सार्वजनिकपणे जाहीर न करण्याचा सल्ला दिला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications