Amazon founder Jeff Bezos will go on a space trip today
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आज जाणार अंतराळ प्रवासावर By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:41 AM1 / 9जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे त्यांचे बालपणीचे स्वप्न साकार करण्यासाठी आज अंतराळाच्या प्रवासावर जाणार आहे. 2 / 9 बेजोस त्यांच्याच 'ब्लू ओरिजिन' कंपनीच्या 'न्यू शेपर्ड' रॉकेटमधून आज अंतराळाच्या प्रवासासाठी रवाना होतील. या प्रवासात बेजोस केवळ 11 मिनिटे अंतराळात राहणार आहे.3 / 9 बेजोस यांच्यासोबत इतर तिघे असतील. मिळालेल्या माहितीनुसार, बेजोस यांची टीम मागच्या आठवड्यात अंतराळात गेलेल्या रिचर्ड ब्रेनसन यांच्यापेक्षाही पुढे जाईल.4 / 9 जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीचे टूरिजम रॉकेट न्यू शेपर्ड आज चार जणांना घेऊन आंतराळात जातील.5 / 9 त्या रॉकेमध्ये जेफ बेजोससह त्यांचे भाऊ मार्क, नीदरलँडमधील 18 वर्षीय ओलिवर डेमन आणि 82 वर्षीय महिला वेली फंक असतील. 6 / 9 नऊ दिवसांपूर्वीच व्हर्जिन गॅलेक्टिकचे रिचर्ड ब्रेनसन अंतराळात जाऊन आले आहेत.7 / 9 पाच मजली इमारतीइतके उंच असलेल्या न्यू शेपर्ड रॉकेटला सहा जणांना घेऊन अंतराळात जाण्यासाठी तयार करण्यात आले आहे.8 / 9 हे रॉकेट प्रवाशांना जवळपास 340,000 फुट उंचीवर घेऊन जाईल. रॉकेटमधून वर गेल्यानंतर काही काळासाठी प्रवाशांना मायक्रोग्रॅविटीचरा अनुभव घेता येईल. 9 / 9 त्या उंचीवर गेल्यावर संपूर्ण पृथ्वी पाहता येईल. बेजोस यांचा अंतराळ प्रवास भारती वेळेनुसार, सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications