America is also traitor! in 1971 against Pakistan war air strikes were ordered on India
चीनच नाही, अमेरिकाही विश्वासघातकी! एकेकाळी भारतावरच हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 11:54 AM1 / 11अमेरिका आणि भारताची दोस्ती ही अलिकडच्या काळात बहरली आहे. यामुळे भारत चीन सीमावादावरून अमेरिका आशियामध्ये जवळपास ९,५०० सैनिक हलविणार आहे. हे सैन्य़ कोणत्या देशात किंवा कोणत्या भागात तैनात करण्यात येणार याची माहिती नसली तरी चीन ज्या देशांना गिळंकृत करू पाहत आहे त्या देशांना मदतीसाठी नक्कीच असणार आहे. मात्र, याच अमेरिकेने 1971 मध्ये याच सैन्याला भारतावर हल्ल्याचे आदेश दिले होते. 2 / 11अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी 'चिनी लष्कराच्या कारवाया सध्याच्या घडीचं मोठं आव्हान आहेत आणि त्यांचा सामना करण्यासाठी सर्व संसाधनं योग्य ठिकाणी असावीत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यानुसार जर्मनीमध्ये अमेरिकेच्या 52 हजार सैन्यापैकी 9500 सैन्य आशियामध्ये तैनात करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 3 / 11अमेरिका आणि भारताचा दोस्ताना जगात खूप चर्चिला जातो. भारतात गुंतवणूक करणारा अमेरिका सर्वात मोठा देश आहे. गेल्या काही वर्षांत अमेरिकेने भारताला लाखो कोटींची युद्धसामुग्री विकली आहे. यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान चांगले संबंध आहेत. पण याच अमेरिकेने एकेकाळी भारतावर हल्ल्याचे आदेश दिले होते. 4 / 111971 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु होते. यावेळी अमेरिकेच्या सरकारने त्यांच्या सैन्याला भारतावर हल्ल्याचे आदेश दिले होते. 2011 मध्ये समोर आलेल्या युद्धाच्या गोपनिय कागदपत्रांमुळे अमेरिकेची धोकेबाजी उघड झाली होती. मात्र, तोपर्यंत भारताला एवढेच माहिती होते, की बंगालच्या खाडीमध्ये अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी नौदलाची सातवी तुकडी रवाना केली होती. 5 / 11अमेरिका एवढी धोकेबाज होती की तेव्हा अमेरिकेने नौदलाला पाठविण्याचे कारण म्हणजे भारतातून अमेरिकी नागरिकांना बाहेर काढणे आहे एवढेच सांगितले होते. मात्र, कागदपत्रांनी पोलखोल केली. या युद्धनौकांमध्ये अमेरिकी सैनिक भरलेले होते. त्यांना भारतावर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते. 6 / 11या युद्धाने बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. पण त्यासाठी भारताला मोठी जोखिम उचलावी लागली होती. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांग्लादेशला पाकिस्तानपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. हे समजताच अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी भारताला धडा शिकविण्याची पूर्ण तयारी केली होती. 7 / 11भारतावर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने नौसेनेच्या तीन बटालियनना हल्ल्याच्या तयारीचे आदेश दिले होते. एवढेच नाही तर अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअर यूएसएस एंटरप्राईजला भारतीय शहरांवर हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते. तसेच पाकिस्तानला भारताविरोधात लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रेही पुरविण्यात येत होती. 8 / 11भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या 6 पानांच्या या कागदपत्रांमध्ये 1971 च्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या चालबाजीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना थेट जबाबदार म्हटले आहे. यूएसएस एंटरप्रायझेसकडे तैनाच बॉम्बर फोर्सला अमेरिकेच्या अध्यक्षांचे भारतावर हल्ला करण्याचे थेट आदेश होते. 9 / 11. भारताला हल्लेखोर म्हणून बदनाम करणे आणि बंगालच्या खाडीमध्ये नौदलाला पाठविण्याचा निर्णय निक्सन यांचाच होता, असा उल्लेख या कागदपत्रांमध्ये करण्यात आला आहे. 10 / 11नेहमीप्रमाणे 1971 चे युद्धही भारतानेच जिंकले होते. पाकिस्तानी सैन्याने भारताच्या शूर जवानांसमोर गुडघे टेकले होते. नेमके हेच अमेरिकेला होऊ द्यायचे नव्हते. 14 डिसेंबरला पाकिस्तानी जनरल ए. ए. के. नियाजी यांनी ढाक्यामध्ये अमेरिकी काऊन्सिल जनरलसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे म्हटले होते11 / 11हा संदेश थेट अमेरिकेला पाठविण्यात आला. मात्र, यानंतर 19 तासांनी भारताला याबाबत कळविण्यात आले. एवढ्या वेळामध्ये अमेरिका भारतावर हल्ला करण्याचा विचार करत होता, असे भारतीय कुटनीती तज्ज्ञांनी या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications