शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनला घेरलं! दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेनं पाठवल्या दोन घातक विमानवाहू युद्धनौका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 1:21 PM

1 / 10
एकीकडे लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्यामधील तणाव वाढतच चालला आहे, तर दुसरीकडे दक्षिण चिनी समुद्रातही चीननं आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. (सर्व छायाचित्र - @USNavy)
2 / 10
त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने आण्विक शस्त्रास्त्रानं सुसज्ज दोन विमानवाहू युद्धनौका दक्षिण चीन समुद्राकडे पाठवल्या आहेत. त्यामुळे दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचा चीनबरोबरचा ताण शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत.
3 / 10
चीन हिंदी आणि प्रशांत महासागरात आपली सैन्य ताकद वाढवत असताना जगातील इतर देश ड्रॅगनला घेराव घालण्यास सज्ज आहेत. तसेच चीननं जास्तच अरेरावी केल्यास ते देश चीनला चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.
4 / 10
चीनवर दबाव आणणं आवश्यक असून, अमेरिकेने आपल्या दोन युद्धनौका यूएसएस रोनाल्ड रेगन आणि यूएसएस निमित्झ दक्षिण चिनी समुद्रात तैनात केल्या आहेत. तेव्हापासून या प्रदेशात तणाव शिगेला पोहोचला आहे.
5 / 10
या दोन्ही युद्धनौका विमानवाहू असल्यानं समुद्रात चीनकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्यास हवाई मार्गेही चीनला कचाट्यात पकडता येऊ शकेल, अशी अमेरिकेची योजना आहे. विशेष म्हणजे यूएसएस रोनाल्ड रेगन आणि यूएसएस निमित्झ या दोन्ही युद्धनौका आण्विक शस्त्रांनी सुसज्ज मल्टी-मिशन विमानवाहू आहेत.
6 / 10
या युद्धनौका जगातील सर्वात मोठ्या जहाजांमध्ये मोजली जातात आणि त्या दोघांतही सुमारे 5,000 नौदलाचं सैन्य वाहून नेण्याची क्षमता आहे. आण्विक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज युद्धनौका तैनात केल्याने अमेरिका चीनविरोधात आपली शक्ती वापरण्यास कोणतीही तमा बाळगणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
7 / 10
अमेरिका आणि चीनमधील तणाव किती प्रमाणात वाढला आहे हे देखील यातून दिसून येते. चीनला अद्दल घडवण्याची अमेरिका संधी शोधत आहे. चिनी नेव्हीही याच भागात युद्धसराव करत असताना अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका पाठवून चीनला एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
8 / 10
गेल्या काही दिवसांपासून चिनी नौदल आपली लष्करी तयारी दर्शवून तैवान आणि इतर शेजारच्या देशांना धमकावत आहे. व्हिएतनाम ते तैवानपर्यंत प्रत्येक शेजारच्या देशाशी चीनने संघर्ष आणि तणाव वाढविला आहे. फिलिपिन्सनेही चीनविरोधात मोर्चा उघडला आहे. फिलिपिन्सने चीनला दक्षिण चीन समुद्रातील युद्धसराव बंद करण्याचा इशारा दिला आहे.
9 / 10
गेल्या काही महिन्यांत दक्षिण चीन समुद्रातील अशा संघर्षांमध्ये बरेच वाढ झाली आहे. यापूर्वी अमेरिकेने आपले सैन्य युरोपमधून आशियाई देशांमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून भारतासह आशियातील आपल्या सर्व मित्र देशांना वेळप्रसंगी मदत करता यावी.
10 / 10
संपूर्ण जग चीनच्या विरोधात एकत्र आले असून, राजकीय समीकरणे बदलत आहेत. चीनचे शत्रू एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करत असून, चीनची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. चीनच्या शत्रूंची संख्या खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने आण्विक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमानवाहू युद्धनौका दक्षिण चिनी समुद्रात धाडणं म्हणजे चीनच्या वर्चस्वाला एक प्रकारे हे आव्हानच आहे.
टॅग्स :Americaअमेरिका