america coronavirus 90000 americans could die of covid 19 in next three weeks
कोरोनाचा हाहाकार! 21 दिवसांत तब्बल 90 हजार जणांच्या मृत्यूची भीती; "या" देशात गंभीर परिस्थिती; CDC चा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 8:48 AM1 / 14कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. 2 / 14अमेरिका आणि इतर देशात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 9 कोटींचा टप्पा पार केला आहे. 3 / 14जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 2,017,798 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 94,309,732 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 67,341,548 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 4 / 14कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. 5 / 14जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. 6 / 14काही देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. तर काही ठिकाणी कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र अमेरिकेत दिवसागणिक परिस्थिती आणखी गंबीर होत असून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. 7 / 14नववर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दोन आठवड्यातच अमेरिकेत कोरोनामुळे तब्बल 38 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला. यातच आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. सीडीसीने याच दरम्यान एक धक्कादायक खुलासा केला आहे. 8 / 14सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड कंट्रोलने (CDC) दिलेल्या माहितीनुसार. अमेरिकेत येत्या तीन आठवड्यात तब्बल 90 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे. सीडीसीने ही भीती व्यक्त केल्याने चिंता वाढली आहे.9 / 14एका रिसर्चनुसार, कोरोनामुळे अमेरिकेतील सरासरी आर्युमानात एक वर्षाची घट झाली आहे. 77.48 इतके आर्युमान नोंदवण्यात आल्याची माहिती संशोधकांनी दिली. 2003 नंतरचे हे सर्वाधिक कमी आर्युमान असल्याची माहिती मिळत आहे.10 / 14अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. तसेच अनेक राज्यातील रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. या महिन्यातच अमेरिकेत सुमारे 30 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 14गेलं वर्ष कोरोना संकटाचं सामना करण्यात गेल्यानंतर नव्या वर्षात जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. काही देशांमध्ये कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स जाणवू लागले आहेत. 12 / 14युरोपातल्या नॉर्वेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नॉर्वेत नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात लसीकरणास सुरुवात झाली. लस टोचण्यात आल्यावर तिचे साईड इफेक्ट्स दिसतील, अशी माहिती नॉर्वे सरकारकडून आधीच देण्यात आली होती. 13 / 14नॉर्वेत आतापर्यंत 33 हजार जणांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 29 जणांमध्ये साईड इफेक्ट्स दिसून आले असून यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. नॉर्वेत नागरिकांना फायझरची लस दिली जात आहे.14 / 14सध्या जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जगभरातील 3 कोटींपेक्षा अधिक लोकांना ही लस देण्यात आली आहे. तसंच काही दिवसांपासून अमेरिकेतही लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आणखी वाचा Subscribe to Notifications