शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार म्हणाल्या, "भगवद्गीतेमध्ये खूप शांती अन् शक्ती मिळते"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 5:15 PM

1 / 10
कोरोना व्हायरसच्या संकटापाठोपाठ अमेरिकेला वर्णभेदी विरोधी आंदोलनामुळे मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड यांनी लोकांना भगवद्गीतेमधून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यास सांगितले आहे.
2 / 10
पीटीआयच्या वृत्तानुसार, तुलसी गबार्ड यांनी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात सहभाग घेताना होता. यावेळी त्या म्हणाल्या की, गोंधळाच्या काळात तुम्हाला भभगवद्गीतेमधून निश्चितता, सामर्थ्य आणि शांती मिळेल.
3 / 10
अमेरिकेच्या हवाईचे खासदार तुलसी गबार्ड म्हणाल्या की, सध्या अराजक माजलेले आहे. उद्या काय होईल हे कुणालाही ठामपणे सांगता येत नाही. परंतु भगवद्गीतेच्या माध्यमातून भक्ती योग आणि कृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगद्वारे आपल्याला शांती आणि शक्ती प्राप्त होईल.
4 / 10
अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयडच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात निदर्शने केली जात आहेत. अशावेळी क्लास ऑफ 2020 हिंदू विद्यार्थ्यांशी बोलताना तुलसी गबार्ड यांनी हे वक्तव्य केले आहे.
5 / 10
हिंदू स्टूडेंट्स काउंसिलने या व्हर्च्युअल हिंदू कमेंसमेंटचे आयोजन केले होते. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया येथील विद्यार्थ्यांनी देखील या कार्यक्रमात भाग घेतला होता.
6 / 10
तुलसी गबार्ड म्हणाल्या, 'ज्यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यातला एखादा नवीन टप्पा सुरू करणार असाल, तर त्यावेळी तुम्ही स्वतःला विचारा तुमच्या जीवनाचे ध्येय काय आहे? तुमच्या आयुष्याचे ध्येय देवाची आणि त्याच्या मुलांची सेवा करणे, कर्म योगाचा सराव हे आहे, तर तुम्ही नक्कीच खऱ्या यशस्वी आयुष्याकडे वाटचाल करत आहात.'
7 / 10
हा कार्यक्रम भगवद्गीतेच्या उपदेशासंबंधी केंद्रीत होता. हिंदू स्टुडेंट्स काउंसिलची स्थापना 1990 साली झाली होती. ही नॉर्थ अमेरिकेमधील सर्वात मोठी हिंदू युवक संघटना आहे.
8 / 10
दरम्यान, लष्करात कार्यरत असलेल्या तुलसी गबार्ड यांची राजकीय कारकिर्द लक्षवेधी आहे. 2016 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांच्याऐवजी बर्नी सँडर्स यांना समर्थन देणाऱ्यांमध्ये गबार्ड यांचा समावेश होता.
9 / 10
2016 मध्ये तुलसी गबार्ड डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या उपाध्यक्ष होत्या. सँडर्स यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.
10 / 10
तुलसी गबार्ड भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थक आहेत. मोदी पंतप्रधान होण्याआधीपासूनच त्या मोदींच्या समर्थक आहेत. भारताच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी मोदींची भेटही घेतली होती. त्याचप्रमाणे जेव्हा मोदींनी अमेरिकेचा दौरा केला तेव्हा त्यांनी गबार्ड यांची भेट घेतली होती.
टॅग्स :Americaअमेरिकाgeorge floydजॉर्ज फ्लॉईडNarendra Modiनरेंद्र मोदी