ट्रम्प संतापले! चीनविरोधात अमेरिकेनं उचललं कठोर पाऊल; जागतिक पडसाद उमटणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:23 IST
1 / 9इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने चीनच्या एका तेल रिफायनरीवर निर्बंध लावले आहेत. ही रिफायनरी हूतियो संबंधित जहाजाकडून जवळपास ५० करोड डॉलर इराणी तेल खरेदी करत होते. गुरुवारी अमेरिकन वित्त मंत्रालयाने घोषणा करत त्यावर निर्बंध लावले आहेत.2 / 9अमेरिकेनं केलेल्या या कारवाईवर चीन संतप्त झाली आहे. अमेरिका चीन आणि इराण यांच्यातील सामान्य व्यापारात अडथळा आणत आहे असं चीनने म्हटलं आहे. अमेरिकेची ही कारवाई ग्लोबल एनर्जी मार्केट किती जटिलरित्या संघर्ष करतंय हे दिसून येत आहे. भारतही ऊर्जा गरजेसाठी आयातीवर निर्भर आहे. त्यामुळे भारतानेही सतर्क राहायला हवं. 3 / 9अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर अधिक दबाव आणण्याची रणनीती पुन्हा सुरू केली आहे. त्या अंतर्गत अनेक लोक, संस्था यांच्यावर निर्बंध लादले जात आहेत. त्यात इराणच्या पेट्रोलियम मंत्र्यांचाही समावेश आहे. अमेरिकन परराष्ट्र खात्याने चीनी तेल टर्मिनलवर निर्बंध आणलेत. 4 / 9इराणची तेल रिफायनरी खरेदी इराण सरकारसाठी आर्थिक लाईफलाईन आहे. हे शासन जगातील दहशतवाद्यांचा सर्वात मोठा समर्थक आहे असं विधान अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी केले. तर हे निर्बंध राष्ट्रपती ट्रम्प यांच्या नीतीमुळे लावले जात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस यांनी सांगितले.5 / 9अमेरिकेच्या या कारवाईमागचा हेतू इराणच्या तेल निर्यातीला शून्य करण्याचा आहे. चीन इराणच्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. इराण तेल विक्रीतून मिळणाऱ्या महसूलाचा वापर अमेरिकेच्या सहकारी देशांवर आणि जगात दहशतवाद पसरवण्यासाठी करतं असा अमेरिकेचा आरोप आहे.6 / 9भारताला सतर्क राहण्याची गरज - अमेरिकेच्या या कारवाईचा चीनने कडाडून विरोध केला आहे. यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक पातळीवर घडणाऱ्या या घडामोडीत भारताला सतर्क होण्याची गरज आहे.7 / 9अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्षही यातून दिसून येतो. त्याशिवाय भारताला या क्षेत्रात आपली रणनीती स्थिती संतुलन ठेवणे किती गरजेचे आहे त्याचे संकेत आहेत. अमेरिका त्यांचे निर्बंध लागू करण्याची किती तयारी करतोय हे पाहावे लागेल.8 / 9चीनसारख्या प्रमुख आर्थिक शक्ती असणाऱ्या देशाविरोधात कारवाई करण्यासही अमेरिकेने मागे हटणार नाही हे दाखवून दिले. अशावेळी भारतातील त्या संस्थांसोबत व्यापार करणे कठीण होईल ज्या अमेरिकन निर्बंधांमध्ये येऊ शकतील. 9 / 9सध्याच्या घडीला भारताला तेल स्त्रोतासाठी विविधता आणण्यासोबतच रिन्यूएबल एनर्जीत गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आयात निर्भरता कमी करता येऊ शकते.