शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पृथ्वीवर घोंगावतेय महाविनाशाचे संकट, अणुबॉम्ब वाचवू शकतात जीव; वैज्ञानिकांचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 5:42 PM

1 / 9
अंतराळातून एक लघुग्रह पृथ्वीला धडकण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. कोट्यवधी वर्षांपूर्वी असाच एक लघूग्रह (Asteroid) धडकल्याने डायनासोर नष्ट झाले होते. यामुळेच आता वैज्ञानिक या धोक्यावर तोडगा शोधण्यात व्यस्त आहेत.
2 / 9
वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की या लघूग्रहाला पृथ्वीच्या मार्गातून दूर करण्यासाठी अणुबॉम्ब डागणे एक चांगला पर्याय असू शकतो. लघूग्रह धडकण्याची वैज्ञानिकांनी व्यक्त केलेली चिंता निराधार नाही. एक असाच लघुग्रह मॅक्सिकोजवळ धडकल्याने पृथ्वीवरील डायनासोर नामशेष झाले आहेत.
3 / 9
कोट्यवधी वर्षांपूर्वी झालेल्या या धडकेच्या वेळी पृथ्वीवर डायनासोरचे राज्य होते. आता त्यांचे केवळ नावच शिल्लक राहिले आहे. यामुळेच, वैज्ञानिक आता या धोकादायक लघुग्रहांचा मार्ग रोखण्यासाठी अणुबॉम्बच्या वापरासह अनेक पर्यायांवर विचार करत आहेत.
4 / 9
नवीन संशोधनात दावा करण्यात आला आहे, की अशा लघुग्रहाला पृथ्वीच्या मार्गातून दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असेल. यामुळे लघुग्रहाचे लहान तुकड्यांत रुपांतर होईल.
5 / 9
अणुबॉम हा शेवटचा पर्याय - हे संशोधन नुकतेच जर्नल अॅक्टा अॅस्ट्रोनॉटिकामध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनात, वेळ कमी राहिल्यास लघुग्रह नष्ट करण्यासाठी अणू ऊर्जेच्या वापरावर भर देण्यात आला आहे. तथापि, असे करणे सोपे नाही. वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की अणुबॉम्बचा वापर शेवटचा पर्याय म्हणूनच करायला हवा. तसेच, वेळ असेल तर लघुग्रहाचा मार्ग बदलण्याचा पर्यायच शोधला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.
6 / 9
अमेरिकन स्पेस एजन्सी NASA, पृथ्वीवर धडकण्याची शक्यता असणाऱ्या लघुग्रहावर लक्ष ठेवते. एवढेच नाही, तर लघुग्रह Bennu पृथ्वीवर केव्हा धडकण्याची शक्यता सर्वाधिक आहे, हे देखील नासाच्या वैज्ञानिकांना एका ताज्या अभ्यासात आढळून आले आहे.
7 / 9
महत्वाचे म्हणजे, 2300 पर्यंत हा लघुग्रह धडकण्याची शक्यता किती आहे, यासंदर्भातही Bennu पासून परतणाऱ्या OSIRIS-REx स्पेसक्राफ्टच्या डेटाच्या मदतीने अचूकपणे माहिती मिळाली आहे. या अभ्यासाच्या मदतीने पूर्वीच्या तुलनेत अधिक अचूक अंदाज लावला जाऊ शकतो.
8 / 9
पूर्वीच्या अंदाजापेक्षा अधिक अचूक Osiris-Rex च्या आधी असे मानले जात होते, की Bennu पृथ्वीला धडकण्याची शक्यता 2200 पर्यंत 2,700 मधून एक आहे. आता दिसून आले आहे, की 2300 पर्यंत याची शक्यता 1,750 मधून एक आहे. तर सर्वात अचूक तारीख 24 सप्टेंबर, 2182 आढळून आली आहे.
9 / 9
ही तारीख पूर्वीच्या तुलनेत अधिक लांबची आहे. पण, तरीही कमीच आहे. नासाच्या डीप स्पेस नेटवर्क आणि कंप्यूटर मॉडेल्सच्या मदतीने वैज्ञानिक 2135 पर्यंत याच्या मार्गासंदर्भात अचूक माहिती मिळवू शकतात.
टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिकाUSअमेरिका