american embassy of kabul guidelines on who should come to hamid karzai international airport
Afghanistan Taliban Crisis: काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणी यावे? अमेरिकेन दूतावासाची मार्गदर्शक तत्त्वे जारी By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 11:14 PM1 / 12तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथील अन्य देशांच्या नागरिकांनी मायदेशात जाण्यासाठी धडपड सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच झुंबड उडाल्याचे जगाने पाहिले. (Afghanistan Taliban Crisis)2 / 12तसेच अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी काही जण विमानाच्या काही भागांवर बसले होते. मात्र, विमान सुरू होताच ते खाली पडून मोठी दुर्घटना घडली होती. याशिवाय, काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. 3 / 12तालिबानने देश ताब्यात घेतल्याच्या एका आठवड्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमध्ये आयसिससारख्या अतिरेकी संघटानांकडून असलेल्या धोक्याबद्दल, देशाबाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली आहे. (american embassy of kabul)4 / 12गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि लोकांचे स्थलांतर कोणतीही दुर्घटना न होता करण्यासाठी काबुलमधील अमेरिकन दूतावासाने हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणाला येता येईल? याबाबतचा तपशील जारी केला आहे.5 / 12विशेष सूचना मिळेतपर्यंत विमानतळावर न जाण्याचे आवाहन यावेळी अमेरिकन दूतावासाने केले आहे. यापूर्वी शनिवारी अमेरिकन दूतावासाने काबूल विमानतळाबाहेर ‘संभाव्य सुरक्षा धोक्यांचा’ इशारा पाठवला होता आणि अमेरिकन नागरिकांना सरकारी अधिकाऱ्याकडून वैयक्तिक सूचना मिळाल्याशिवाय विमानतळावर न येण्याचा सल्ला दिला होता.6 / 12काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणी यावे, याबाबत अमेरिकेच्या दूतावासाने नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जर तुम्ही अमेरिकन नागरिक असाल, अमेरिकन कायदेशीर कायमस्वरूपी रहिवासी, स्थलांतरित व्हिसा अर्जदार, किंवा अमेरिकन सरकारशी संलग्न असाल आणि तुम्हाला हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास करण्यासाठी विशिष्ट सूचना मिळाल्या असतील तर तुम्हाला दिल्या गेलेल्या सूचनांचे पालन करा.7 / 12जर तुम्ही SIV किंवा P1/P२ प्रक्रिया सुरू केली असेल, तर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी सूचना दिल्या जातील. या प्रक्रियेला जास्त कालावधी लागू शकतो. जर तुम्ही वरील गटांचा भाग नसाल. 8 / 12पण, अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर सूचना मिळेपर्यंत कृपया हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊ नका. तुमच्याकडे व्हेरीफाईड इन्व्हिटेशन नसल्यास, तुम्हाला विमानतळावर किंवा निर्वासितांच्या विमानामध्ये जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.9 / 12दरम्यान, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी १४ ऑगस्टपासून अमेरिका आणि सहयोगी सैन्याने अफगाणिस्तानातून सुमारे २८ हजार लोकांना बाहेर काढले असल्याचे म्हटले आहे.10 / 12जुलैपासून आम्ही बाहेर काढलेल्या नागरिकांची एकूण संख्या अंदाजे ३३ हजार पोहोचली आहे. तर, अमेरिकेच्या १४ सी-१७एस, ९ सी-१३० विमानांसह- २३ लष्करी विमानांनी रविवारी ३ हजार ९०० प्रवाशांना घेऊन काबूल सोडले आहे.11 / 12याच कालावधी आमच्या लष्कराने आणखी ३५ चार्टर्ड फ्लाइट्सची सुविधा पोहोचली आहे. ज्याद्वारे अन्य देशांच्या अतिरिक्त ४ हजार लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, असेही राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे. 12 / 12दरम्यान, तालिबानचा प्रवक्ता सोहेल शाहीनने सोमवारी कतारमध्ये सांगितले की, जर अमेरिकेने आपल्या सैनिकांना माघारी बोलावण्यात उशीर केला तर त्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील. अमेरिकन सैनिकांच्या माघारीसाठी ३१ ऑगस्ट हीच डेडलाईन तालिबानकडून घोषित करण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications