शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेची महाभयंकर चूक, तालिबानला सोपवली 'अफगाण सहकाऱ्यांची' यादी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 8:46 PM

1 / 8
अफगाणिस्तानला मध्येच सोडून चाललेल्या अमेरिकेने आणखी एक मोठी चूक केली आहे. अमेरिकेने तालिबानला काही अशा लोकांची यादी दिली आहे. ज्यांना तालिबान आपला कट्टर शत्रू समजतो. (American officials provided taliban list of afghanistan allies experts say big mistake)
2 / 8
तालिबानी दहशतवादी घरोघरी जाऊन या लोकांचा शोध घेत होते. मात्र, आता अमेरिकेने त्यांना ही यादी सोपवून त्यांचे काम आणखीनच सोपे केले आहे.
3 / 8
खरे तर, काबुलमध्ये असलेल्या अमेरिकन अधिकाऱ्यांनी तालिबानला अशा काही लोकांची यादी दिली आहे, ज्यांना अफगाणिस्तानातून बाहेर काढायचे आहे. तालिबानने त्यांना काबूल एअरपोर्टपर्यंत येण्यापासून रोखू नये, यासाठीच अमेरिकेने ही यादी तालिबानकडे सोपविली आहे.
4 / 8
अमेरिकेची न्यूज वेबसाइट POLITICO च्या एका वृत्तानुसार, या यादीत अमेरिकन नागरिक आणि ग्रीन कार्ड होल्डर्सशिवाय, अशा अफगाण लोकांचाही समावेश आहे, ज्यांनी अमेरिकेला गेली 20 वर्ष तालिबान विरोधातील युद्धात मदत केली.
5 / 8
मात्र, आता अमेरिकेने उचलेल्या या पावलामुळे हजारो अफगाण नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्याने हे लोक भयभीत झाले आहेत. तसेच शक्य तेवढ्या लवकर अफगाणिस्तान सोडण्याची त्यांची इच्छा आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे.
6 / 8
तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा केला. तेव्हापासून आतापर्यंत अमेरिकेने अफगाणिस्तानातून जवळपास 1 लाख लोकांना बाहेर काढले आहे. यांपैकी बहुतेकांना तालिबानच्या अनेक चेक पोस्टवरून जावे लागले आहे. ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी अमेरिकेने तालिबानला, ज्या लोकांना बाहेर काढायचे आहे, अशांची यादी दिली आहे.
7 / 8
अमेरिकेच्या एका संरक्षण अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हटले आहे, की खरे तर अमेरिकेने तालिबानला 'किल लिस्ट'च सोपविली आहे. एवढेच नाही, तर हे अत्यंत धक्कादायक असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
8 / 8
ज्यो बायडन यांना गुरुवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान या वृत्तासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला, अशी कुठली यादी आहे, याची आपल्याला पूर्ण कल्पना नाही, असे उत्तर दिले. मात्र, त्यानी हे वृत्त फेटाळले नाही.
टॅग्स :AmericaअमेरिकाTalibanतालिबानJoe Bidenज्यो बायडनAfghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादी