शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धुरळाच...ज्यो बायडन यांची नागरिकांना मोठी भेट; प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार 'इतके' डॉलर

By प्रविण मरगळे | Published: January 15, 2021 2:51 PM

1 / 10
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती ज्यो बायडन येत्या २० जानेवारीला राष्ट्रपतीपदाची शपथ घेत आहेत. परंतु निवडणुकीत लोकांना दिलेलं वचन पूर्ण करण्याची तयारी बायडन यांनी सुरु केली आहे. याबाबत सर्वात महत्त्वाची घोषणा ज्यो बायडन यांनी केली आहे.
2 / 10
कोरोनामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात डबघाईला आली, या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी ज्यो बायडने १.९ ट्रिलियन डॉलर(१३८ लाख कोटी) रुपयांचे मदत पॅकेजची घोषणा केली आहे.
3 / 10
ज्यो बायडन यांनी घोषित केलेल्या मदत पॅकेजला अमेरिकेच्या दोन्ही संसदेत मंजुरी मिळणं गरजेचे आहे. मदत पॅकेजला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्येक अमेरिकन नागरिकांच्या खात्यात १४०० डॉलर म्हणजे ३० हजार रुपये येतील.
4 / 10
याशिवाय ज्यो बायडन यांनी छोट्या व्यावसायिकांना दिलासा देण्याची घोषणा केली आहे. या पॅकेजला अमेरिकन रेस्क्यू प्लॅन नाव देण्यात आलं आहे. ज्यो बायडन यांनी ज्यापद्धतीने पॅकेजची विभागणी केली आहे, त्यात व्यवसाय, शिक्षण आणि प्रत्येक नागरिकाला थेट मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
5 / 10
पॅकेजतंर्गत ४१५ अरब डॉलर कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी खर्च केले जाणार आहेत, तर १४०० डॉलर प्रत्येक नागरिकाच्या खात्यात थेट जमा केले जातील, ४४० अरब डॉलर छोट्या व्यावसायिकांना आर्थिक अडचणीतून बाहेर आणण्यासाठी वापरणार आहेत.
6 / 10
त्याशिवाय १५ डॉलर प्रति डॉलर हिशोबाने कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात येणार आहे, पूर्वी ७ डॉलरप्रमाणे किमान वेतन दिलं जात होतं, मात्र या मदतीच्या पॅकेजवर प्रश्नचिन्ह आहे, कारण ज्यावेळी ट्रम्प यांनी मदतीची घोषणा केली होती, तेव्हा डेमोक्रेटिक पार्टीने टीकेचा भडीमार केला होता.
7 / 10
आताही सीनेटमध्ये रिपब्लिकन पार्टीचं बहुमत आहे आणि मदत पॅकेजच्या प्रस्तावावर ते अडून राहण्याची शक्यता आहे. त्याचसोबत या मदत पॅकेजमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आली नाही, त्यावरूनही वादंग निर्माण होऊ शकते.
8 / 10
यावेळी बायडन म्हणाले की, जे काही करायचं आहे ते तातडीने करायचं आहे, १०० दिवसांत १० कोटी अमेरिकन नागरिकांना लस टोचली जाईल, त्याशिवाय बेरोजगारी भत्त्यात वाढ करून ३०० डॉलरहून आता ४०० डॉलर करण्याचा मानस ज्यो बायडन यांनी बोलून दाखवला.
9 / 10
दरम्यान, मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यात संसदेवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संपूर्ण वॉशिंग्टनमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बायडेन यांचा शपथविधी सोहळा २० जानेवारी रोजी होणार आहे.
10 / 10
इट हाउसपासून नजीकच असलेल्या कॅपिटॉल परिसरात मोठमोठे बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत तसेच व्हाइट हाउस परिसर सील करण्यात आला. शपथविधीच्या दिवशी ट्रम्प समर्थक ५० राज्यांत निदर्शने करणार असल्याची माहिती एफबीआयच्या हाती लागली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे वॉशिंग्टनच्या महापौर म्युरियल बाऊझर यांनी सांगितले.
टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प