शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: ...म्हणून भारतासह पाच देश म्हणजे 'सडलेले सफरचंद'; अमेरिकन तज्ज्ञाचं संतापजनक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 3:51 PM

1 / 7
संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. जगभरात आतापर्यत 76.5 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यत 4.25 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
2 / 7
भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
3 / 7
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 11,458 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 8884 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 308993 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आठ हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
4 / 7
कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी जगभरातील सर्वच देश मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत आहे. मात्र कोरोनाच्या लढाईत भारत म्हणजे एक सडलेला सफरचंद आहे, असं संतापजनक वक्तव्य अमेरिकेचे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील शास्त्रज्ञ स्टीव हँक यांनी केली आहे.
5 / 7
स्टीव हँक यांनी ट्विटरवर भारतासह व्हेनेझुएला, इजिप्त, सीरिया, येमेन, तुर्की आणि चीनवर टीका केली आहे. स्टीव हँक म्हणाले की, भारत, इजिप्त, सीरिया, येमेन, तुर्की आणि चीन हे देश कोरोनाच्या संसर्गाच्या डेटाबाबत एक सडलेलं सफरचंद आहे.
6 / 7
तसेच हे पाचही देश कोरोनाच्या संबंधित संशयित आकडेवारी देत असल्याचा आरोप स्टीव हँक यांनी केला आहे. तसेच त्यांनी एक ग्राफ देखील ट्विटरवर शेअर करत हे सर्व देश म्हणजे एक सडलेलं सफरचंद आहे असं म्हटलं आहे.
7 / 7
स्टीव हँक यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात करण्यात येणाऱ्या उपाययोजानांवरही निशाणा साधला आहे. भारतात कोरोनाच्या चाचण्या खूप कमी प्रमाणात होत असून भारतात इटलीसारखी परिस्थिती उद्भवणार असल्याचा इशारा देखील स्टीव हँक यांनी दिला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प