शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धक्कादायक! ओमायक्रॉन संकटातच आणखी एका रहस्यमय आजाराचा धुमाकूळ, 89 जणांचा मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 12:29 PM

1 / 8
कोरोनाव्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली असतानाच, आफ्रिकेत आणखी एक रहस्यमय आजाराने धुमाकूळ घातल्याची चर्चा आहे. दक्षिण सुदानच्या जोंगलेई राज्यातील उत्तरेकडील फंगाक शहरात या आजाराने अनेकांचा बळी घेतल्याचे वृत्त आहे.
2 / 8
या वृत्ताने जागतिक आरोग्य संघटनेचीही (WHO) झोप उडवली आहे. आता WHO ने या आजाराची लागण झालेल्या लोकांचे नमुने गोळा करण्यासाठी तज्ज्ञांची एक रॅपिड रिस्पॉन्स टीम तेथे पाठवली आहे.
3 / 8
पुरामुळे आधीच खराब आहे परिस्थिती - जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO) अधिकाऱ्याने बीबीसीशी बोलताना सांगितले, की हा आजार किती घातक आहे, याची माहिती मिळविण्यासाठी अथवा तपासणीसाठी एक रॅपिड रिस्पॉन्स टीम पाठविण्यात आली आहे. ही टीम लोकांचे नमुने गोळा करेल.
4 / 8
मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजाराने ग्रस्त असलेला भाग, नुकत्याच आलेल्या भीषण पुरामुळे अधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी एक आहे. यामुळे तज्ज्ञांच्या टीमला येथे हेलीकॉप्टरने प्रवेश करावा लागला.
5 / 8
कुपोषणाचे बळी ठरतायत मुलं... - सुदानचे जमीन, गृहनिर्माण आणि सार्वजनिक उपयोगिता मंत्री लॅम तुंगवार कुइगवाँग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोंगलेईच्या सीमेला लागून असलेल्या राज्यात पूरजन्य परिस्थितीमुळे मलेरियासारख्या रोगांचा प्रसार झाला आहे. अन्नाअभावी बालके कुपोषणाला बळी पडत आहेत.
6 / 8
येथील पाणी तेलामुळे दूषित होत आहे. यामुळे पाळीव प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. दक्षिण सुदानच्या उत्तर भागात आलेला पूर या भागातील जनतेसाठी विनाशकारी ठरला आहे, असेही कुइगवाँग यांनी म्हटले आहे.
7 / 8
लाखो लोकांना पुराचा फटका - संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सी UNHCR ने म्हटले आहे, की देशातील सुमारे 60 वर्षांतील सर्वात मोठ्या पुरामुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत. यासाठी हवामान बदलाला जबाबदार धरले जात आहे.
8 / 8
या भागात काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था Medecins Sans Frontires (MSF)ने म्हटले आहे, की पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे, आता आरोग्य सुरुविधांवरील ताणही वाढत आहे. सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचा सामना करत आहे आणि संक्रमितांची संख्याही सातत्याने वाढत आहे. (सर्व फोटो - प्रतिकात्मक)
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनSouth Africaद. आफ्रिका