1 / 3कोरोना व्हायरसमुळे जगभरातील जास्तीत जास्त देशांमध्ये लॉकडाउन आहे. लॉकडाउनचे कोरोनापासून बचावासोबत आणखीही काही फायदे आहेत. पण फायद्यांसोबतच काही नुकसानही आहेत. स्पेनच्या एका बेटावर लॉकडाउनमुळे डासांचा आकार चार पटीने वाढलाय. 2 / 3इतकेच नाही तर या बेटावरील डासांटी संख्याही वाढली आहे. सोबतच कीड्यांची संख्याही वाढली आहे. स्पेनमधील या बेटाचं नाव आहे इबिजा. इथे डासांचा आकार इतका मोठा झाला आहे की, सरकारचं लक्ष कोरोनावरून हटून आता या डासांकडे लागलं आहे.3 / 3यामागील सर्वात मोठं कारण सांगितलं जातंय लॉकडाउन. लॉकडाउनमुळे अनेक हॉटेल्सचे स्वीमिंग पूल्स घाणेरडे झाले आहेत. यात डास वाढू लागले. ते लोकांच्या घरातही वाढले. खासकरून अशा घरांमध्ये जिथे कुणी राहत नाहीत.