शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sri Lanka Crisis : 'PM मोदी दयाळू, आमचा एअरपोर्टही सुरू केला; भारत आमचा मोठा भाऊ'; श्रीलंकेनं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 8:53 PM

1 / 12
Sri Lanka Crisis : आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील (Sri Lanka Crisis) परिस्थिती सध्या बिकट होत चालली आहे. एकीकडे राजपक्षे सरकार सातत्यानं टीका होत आहे आणि आता श्रीलंकेतील जनतेला रस्त्यावर उतरावे लागले आहे.
2 / 12
दरम्यान, श्रीलंकेचे माजी केंद्रीय मंत्री आणि क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा (Arjuna Aanatunga) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक केले आहे. त्यांनी श्रीलंकेला मदत केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार तर मानलेच पण भारताचा श्रीलंकेचा मोठा भाऊ म्हणूनही उल्लेख केला.
3 / 12
एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अर्जुन रणतुंगा (Arjuna Aanatunga) यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आणि श्रीलंकेतील सध्याच्या परिस्थितीबाबत राजपक्षे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
4 / 12
'जाफना विमानतळ सुरू करण्यासाठी भारताने मदत केली आणि त्यासाठी पंतप्रधान मोदींनी दयाळूपणा दाखवला. भारत आमच्यासाठी मोठा भाऊ आहे, भारताला आमच्या गरजा समजतात. या कारणास्तव भारताने पेट्रोल-औषध यांसारख्या गोष्टींचीही मदत केली आहे. येत्या काळात या सर्व गोष्टींची कमतरता भासू शकते,' असं रणतुंगा म्हणाले.
5 / 12
सध्याच्या राजपक्षे सरकारवर टीका करताना रणतुंगा म्हणाले की, 'सध्याच्या सरकारमध्ये असे काही लोक आहेत ज्यांना समाजात फूट निर्माण करायची आहे. श्रीलंकेतील सध्याच्या परिस्थितीत सर्वत्रच समस्या आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचे सरकार अहंकारी असल्यासारखे वागत आहे.' सरकारमध्ये काही लोक आहेत ज्यांना हिंसाचार हवा आहे, असे होऊ नये. यासाठी मला खूप काळजी वाटते असंही त्यांनी स्पष्ट केलं.
6 / 12
'आंदोलनांमध्ये सामान्य जनता फक्त मूलभूत गोष्टींचीच मागणी करत आहे, यामध्ये दूध, गॅस, तांदूळ, पेट्रोल यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. मात्र, येथे होत असलेल्या हिंसाचाराशी मी सहमत नाही,' असेही ते म्हणाले. येथे रक्तपात होऊ नये ही माझी मोठी चिंता आहे. गेल्या दोन वर्षांत देश मोठ्या संकटात गेला असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
7 / 12
दरम्यान, श्रीलंकेत, आर्थिक संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी पद सोडण्याची मागणी करताना मोठ्या संख्येने लोक निषेध करत आहेत. श्रीलंका सध्या इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
8 / 12
इंधन, स्वयंपाकाचा गॅससाठी लांबच्या लांब रांगा, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि तासनतास वीज खंडित होत असल्यामुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे श्रीलंका सरकारमध्येही खळबळ उडाली आहे.
9 / 12
आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिघडली आहे. एकीकडे राष्ट्रपती गाेटबाया राजपक्षे यांची सत्तेवरील पकड कमकुवत हाेत असल्याचे दिसत आहे. संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर ४१ खासदारांनी सत्ताधारी आघाडीला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. त्यामुळे राजपक्षे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
10 / 12
श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर नवे अर्थमंत्री अली साबरी यांनी तीन मंत्र्यांसह शपथ घेतली हाेती. मात्र, अली साबरी यांनी दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. ४१ खासदारांनी पाठिंबा मागे घेतल्यानंतर सत्ताधारी आघाडीकडे १०९ संख्याबळ आहे. बहुमताचा आकडा ११३ आहे.
11 / 12
२०२०च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये २२५ पैकी १५० जागा जिंकल्या हाेत्या. त्यानंतर विराेधी पक्षाचेही काही सदस्य सत्ताधाऱ्यांच्या कंपूत दाखल झाले हाेते. अशा स्थितीतही सरकारने बहुमताचा दावा केला आहे. तर विराेधी पक्षाने गाेटबाया यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
12 / 12
माजी राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांच्या नेतृत्वाखालील नाराज खासदारांकडून गाेटबाया यांना हटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिणामी सरकार अल्पमतात आल्याचे चित्र असून राजपक्षे यांची सत्तेवरील पकड कमकुवत झाल्याचे दिसत आहे. अली साबरी यांनी दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. नव्या अर्थमंत्र्याची नियुक्ती करण्यासाेबतच सध्याच्या संकटसमयी काही अपरंपरागत पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSri Lankaश्रीलंकाIndiaभारत