शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'इस्रो'चा आणखी एक 'विक्रम'; FIFA वर्ल्डकपमधील सामन्याचा रेकॉर्ड मोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 4:29 PM

1 / 11
जगभरातील भारतीयांचे डोळे काल इस्रोच्या चंद्रयान मोहिमेकडे लागले होते. टिव्हीवर, मोबाईलवर, कॉम्प्युटरवर, स्क्रीनवर, जेथे मिळेल त्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येकजण चंद्रयानाचा लँडींग पाहात होता.
2 / 11
भारताचे चंद्रयान दक्षिण धुव्रावर उतरले आणि इस्रोने इतिहास रचला. या ऐतिहासिक क्षणासह इस्रोने आणखी विक्रम रचला आहे. जगात सर्वाधिक लाईव्ह पाहिलं जाणारं यूट्यूब होण्याचा बहुमान काल इस्रोच्या नावे जमा झाला.
3 / 11
कॅसिमिरो नावाच्या यूट्यूबरनं २०२२ च्या फिफा वर्ल्डकपमधील ब्राझील विरुद्ध क्रोएशिया सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं होतं. हा सामना ६.५ मिलियन प्रेक्षकांनी पाहिला होता.
4 / 11
इस्रोनं फिफा वर्ल्डकपचा हा विक्रम काल मोडीत काढला. इस्रोनं कालचं लाईव्ह ८ मिलियनपेक्षा अधिक जणांनी पाहिलं आणि इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलनं मोठा विक्रम रचला. विशेष म्हणजे एकाच दिवसांत इस्रोचे तब्बल १३ लाख सबस्क्राईबर्सही वाढले आहेत.
5 / 11
चांद्रयान-३ च्या लँडिंगची प्रक्रिया ५ वाजून २० मिनिटांनी सुरू झाली. तेव्हापासून इस्रोनं लाईव्ह सुरू केलं. तेव्हापासूनच लाखो लोक यूट्यूब पाहात होते.
6 / 11
इस्रोला आतापर्यंत कधीच सब्सक्राईब न केलेल्या, यूट्यूबवर कधीही इस्रो सर्च न केलेल्या अनेकांनी काल चांद्रयान-३ च्या लँडिंगचा सोहळा पाहिला.
7 / 11
इस्रोच्या यूट्यूबवर येऊन लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या त्यांच्या सब्सक्राईबर्सपेक्षा दुप्पट होती. हा आकडा तब्बल ८ मिलियन्स लाईव्ह प्रेक्षकांपर्यंत पोहोचला होता.
8 / 11
काल संध्याकाळी चांद्रयान-३ ची लँडिग प्रक्रिया सुरू होण्याआधी इस्रोच्या यूट्यूब चॅनेलच्या सब्सक्राईबर्सची संख्या २.६८ मिलियन होती. मात्र लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू होताच ९ मिनिटांत २.९ मिलियन प्रेक्षक लाईव्ह पाहू लागले.
9 / 11
१३ मिनिटांत प्रेक्षकांचा आकडा ३.३ मिलियनवर गेला. १७ व्या मिनिटाला लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या ४ मिलियनच्या घरात पोहोचली. ३१ मिनिटांनंतर हाच आकडा ५.३ मिलियन म्हणजेच ५३ लाख इतका होता.
10 / 11
लाईव्ह ४५ मिनिटांच्या पुढे गेल्यानंतर लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या ६.६ मिलियनवर गेला. तर २२ तासानंतर सॉफ्ट लँडींगचे लाईव्ह पाहणाऱ्यांचा आकडा तब्बल ७२ मिलियन्सवर पोहोचला आहे.
11 / 11
लाईव्ह ४५ मिनिटांच्या पुढे गेल्यानंतर लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या ६.६ मिलियनवर गेला. तर २२ तासानंतर सॉफ्ट लँडींगचे लाईव्ह पाहणाऱ्यांचा आकडा तब्बल ७२ मिलियन्सवर पोहोचला आहे.
टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3YouTubeयु ट्यूबFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२